पावसाळ्यापूर्वी नदी सफाईचे कार्य पूर्ण

– तीनही नद्यांतून १ लाख ३१ हजार क्यूबिक मीटर गाळ काढला

नागपूर :- पावसाळ्यापूर्वी शहरातील प्रमुख तीनही नद्यांच्या स्वच्छतेचे लक्ष्य पूर्ण झालेले आहे. शहरातील नाग नदी, पिवळी नदी आणि पोहरा नदीच्या स्वच्छतेचे कार्य पूर्ण करण्यात आलेले आहेत. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात हे नदी स्वच्छता अभियान पूर्णत्वास आले आहे.

नागपूर शहरातून वाहणा-या नाग नदी, पिवळी नदी आणि पोहरा नदी या तिनही नद्यांच्या स्वच्छतेचे कार्य मनपा आयुक्तांच्या मार्गदर्शनात फेब्रुवारी महिन्यात सुरू करण्यात आले होते. नदी स्वच्छता अभियानाद्वारे तीनही नद्यांच्या पात्रातून एकूण १ लाख ३१ हजार ४२९.१७ क्यूबिक मीटर गाळ काढण्यात आला आहे. नाग नदीची लांबी १६.५८ किमी, पिवळी नदीची लांबी १७.४२ आणि पोहरा नदीची लांबी १५.१७ किमी आहे. नाग नदीची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली.

स्वच्छते दरम्यान ६४८९६.०५ क्यूबिक मीटर गाळ काढण्यात आला. या नदीतून ३१६३० क्यूबिक मीटर गाळ काढण्यात आला. पोहरा नदीच्या स्वच्छतेचे देखील कार्य पूर्ण झाले. या स्वच्छतेतून ३४९०३.१२ क्यूबिक मीटर गाळ काढण्यात आला, अशी माहिती अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार यांनी दिली आहे.

पावसाळ्यामध्ये कोणत्याही प्रकारे नदीच्या प्रवाहाला अडथळा होऊ नये व सुरळीतरित्या पाणी वाहून जावे यादृष्टीने यावर्षी वर्षाच्या सुरुवातीलाच नदी स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले होते. अभियानाच्या अनुषंगाने आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्याद्वारे वेळोवेळी आढावा देखील घेण्यात आला. स्वत: आयुक्तांनी अनेक ठिकाणी भेट देउन नदी स्वच्छतेच्या कार्याची पाहणी केली. येणा-या अडचणी जाणून घेतल्या व त्या सोडविण्याच्या दृष्टीने कार्यवाही देखील केली. आवश्यक त्या ठिकाणी सूचना करून त्यादृष्टीने काम करून घेतले. विभागातील समन्वय आणि आयुक्तांकडून वेळोवेळी घेण्यात येत असलेल्या आढाव्यामुळे पावसाळ्यापुर्वीच तीनही नद्यांची स्वच्छता पूर्ण झालेली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

NVCC ने प्रतिदिन बिजली जाने व सोलर मीटर न मिलने की समस्या को लेकर MDCEL के चीफ इंजीनियर दिलीप दोड़के को दिया प्रतिवेदन

Thu Jun 27 , 2024
नागपूर :- विदर्भ के 13 लाख व्यापारियों की अग्रणी व शीर्ष संस्था नाग विदर्भ चेंबर ऑफ काॅमर्स के उपाध्यक्ष फारूक अकबानी के नेतृत्व में प्रतिनिधीमंडल ने नागपुर को रोजाना बिजली जाने, प्रीपेड मीटर लगने, सोलर मीटर न मिलने व अन्य बिजली की समस्याओं पर डैम्क्ब्स् के दिलीप दोड़के (मुख्य अभियंता) को ज्ञापन दिया। चेंबर के उपाध्यक्ष फारूक अकबानी ज्ञापन के […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com