– मेट्रो फेज 2 प्रलंबित अधिग्रहण आढावा बैठक
नागपूर :- नागपूरसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या मेट्रो फेज 2 प्रकल्पातील अधिग्रहण आढावा आज घेण्यात आला. कोणताही प्रस्ताव प्रलंबित राहणार नाही, याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी महसूल विभागाला केल्या.
मेट्रो प्रकल्पातील जमीन अधिग्रहणाचे काही प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्याचा निपटारा करण्यासाठी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात घेण्यात आली होती.
या बैठकीमध्ये भूमी अधिग्रहण संदर्भातील सर्व प्रस्ताव तातडीने निकाली काढण्याबाबत सूचना करण्यात आल्या. याशिवाय काही प्रकरणात संयुक्त पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले. वर्धा रोडवरील संरक्षण विभागाच्या जागे संदर्भात तातडीने पत्रव्यवहार करण्यात यावा. महसूल विभाग व मेट्रो यांच्यामध्ये अधिक उत्तम समन्वय ठेवून कामे करण्यात यावे. उर्वरित सर्व भूमी अधिग्रहणाच्या प्रकरणांमध्ये कालबद्ध नियोजन करण्यात यावे, अशा सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.
या बैठकीला उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) माधुरी तिखे, उपजिल्हाधिकारी (पेंच प्रकल्प) डॉ.पुजा पाटील, महा मेट्रोचे आर.आनंदकुमार, महामेट्रोचे प्रकाश सकरडे, उपमहाव्यवस्थापक अजय रामटेके, भूमी अभिलेख कामठीचे उपअधीक्षक श्याम पांडे, नगर रचना विभागाचे सहायक संचालक आशिष मोरे, नगर रचनाचे सुरज बालेकर, सादिक अली उपस्थित होते.