गडचिरोली :- गडचिरोली कृषी विभागाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास मंडळ व कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा नियोजन भवन येथे एक दिवसीय कार्यशाळा दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. वाय. आर. खोब्रागडे, सहयोगी प्राध्यापक, कृषी संशोधन केंद्र, सोनापूर, गडचिरोली तसेच भालचंद्र ठाकूर, प्रगतशील अनुभवी शेतकरी, गोंदिया यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यशाळेला जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात हजर होते. कार्यशाळेला अनुभवी शेतकऱ्यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये नगरी ता. गडचिरोली येथील शेतकरी मनोहर कुंभारे व निमगाव ता. धानोरा येथील शेतकरी किशोर चापले यांनी अनुभव कथन केले. याशिवाय कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर, गडचिरोली येथील विषय तज्ञ सुचित लकडे यांनी कार्यशाळेला मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रस्तावित जिल्ह्याच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी केले तर डॉ. किशोर झाडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र सोनापूर, गडचिरोली यांनी जिल्ह्यातील फळबाग लागवडीचे महत्व विशद केले. शेवटी तंत्र अधिकारी गणेश बादाडे यांनी आभार मानून कार्यशाळेची सांगता झाली. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रिती हिरळकर यांनी कळविले आहे.
गडचिरोली येथे आंबा आणि अॅव्होकॅडो लागवड तंत्रज्ञान कार्यशाळा संपन्न
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com