अमरदिप बडगे, प्रतिनिधी
गोंदिया :- यावर्षी जूलै महिन्यातच जिल्ह्यात पावसाचे प्रमाण वाढले असून त्याचा फटका धान उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला आहे तसेच कित्येक शेतकऱ्यांचे धानपिकाचे रोपटे पाण्याखाली आल्याने कुजलेले आहेत त्यामुळे त्यांना दुबार पेरणीची वेळ आलेली आहे व ज्यांचे रोवणी झाली आहे त्यांचे सुद्धा धान पाण्याखाली आल्याने नुकसान झाले आहे. अतिवृष्टी मुळे ज्यांची घरे पडलेली आहेत त्यांना सुधा नुकसानभरपाई मिळावी,वीजपडून प्राण्याची जीवहानी व मनुष्यहानी झालेल्या परिवारास नुकसानभरपाई मिळावी, कित्येकदा मध्यप्रदेशातील धरणाचे पाणी सोडल्याने नदीकाठी वसलेल्या गाव पान्याखाली येतात व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते अशावेळी पूर्व तय्यारी म्हणून गावात स्वत: भेट देवून त्यांना सतर्कतेची सूचना देणे अशा महत्वपूर्ण विषयावर तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी जिल्हाधिकारी नायना गुंडे यांची भेट घेऊन चर्चा करून उपाययोजना करण्याचे आदेश दिले.