संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यातील खैरी ग्रामपंचायतच्या वतीने दीपावलीच्या पर्वावर आयोजित राष्ट्रीय दुय्यम खडा तमाशातून समाज प्रबोधनाचे कार्यक्रम संपन्न झाले.
कलंगी मंडळाचे शाहीर अतुल श्रावणकर ,रामकृष्ण श्रावणकर रेवराल मौदा, तर तुर्रा मंडळाचे विजय गिरीपुंजे ,राहुल मोदानकर चिखलाबोडी आडेगाव तालुका मौदा यांच्या राष्ट्रीय दुय्यम खडा तमाशा समाज प्रबोधनाचे कार्यक्रमाचे उद्घाटन खैरी ग्रामपंचायतचे सरपंच व कामठी तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष मोरेश्वर उर्फ बंडू कापसे यांचे हस्ते फीत कापून करण्यात आली. यावेळी कामठी पंचायत समितीचे माजी सभापती उमेश रडके, जिल्हा परिषद सदस्य मोहन माकडे ,खैरी ग्रा प उपसरपंच विना रघटाटे, ग्रामपंचायत सदस्य नथू ठाकरे, दिलीप ठाकरे, हृदय सोनवणे, दिनेश मानकर ,विजया शेंडे ,प्रीती मानकर ,सुजाता डोंगरे, ग्रामविकास अधिकारी नीलकंठ देवगडे आदी उपस्थित होते. शाहीर अतुल श्रावणकर कलंगी मंडळ व तुरा मंडळाचे विजय गिरीपुंजे यांनी स्वच्छता अभियान, हागणमुक्तदारी गाव, हुंडाबळी ,दारूबंदी आंतरजातीय विवाह, राष्ट्रीय एकात्मता, सायबर गुन्हे महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम, शासनाच्या विविध कल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पथनाट्याच्या माध्यमातून समाज जनजागृती करून महात्मा ज्योतिबा फुले ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा,भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी केलेल्या कार्याची जनजागृती करून समाज प्रबोधन करून राष्ट्रीय एकता निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन ग्रामविकास अधिकारी नीलकंठ देवगडे यांनी केले तर आभार प्रदर्शन शुभम बर्गड यांनी मांडले. राष्ट्रीय दुय्यम खडा तमाशाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने गावकरी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.