संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
अरोली :- रेल्वे स्थानक म्हणून ओळख असलेल्या रेवराल येथील रेल्वे स्थानक रस्त्यावर स्थित नेहरू युवा बहुउद्देशीय शिक्षण संस्था रेवराल द्वारा संचालित इंग्लिश किंडर गार्डन स्कूलमध्ये उद्या 14 फेब्रुवारी शुक्रवारला स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राज्यमंत्री आशिष जयस्वाल,माजी जि प सदस्या राधा मुकेश अग्रवाल, माजी पंचायत समिती सभापती मनोज कोठे, स्वप्निल श्रावणकर, अरोली ठाणेदार स्नेहल राऊत, सामाजिक कार्यकर्ते संजय सत्येकार, सरपंचा मनीषा पाटील, उपसरपंच मोहन धांडे , माजी सरपंच जगदीश श्रावणकर, ग्रामपंचायत सदस्य अंतराम श्रावणकर, केंद्रप्रमुख पत्रे, मौदा तालुक्यातील लहान लहान गावात स्वतः जाऊन वृत्तपत्र वाटप करून त्या त्या गावांमधील छोटे छोटे कार्यक्रमांनाही वर्तमानपत्रात प्रसिद्धी देऊन प्रकाश झोतात आलेले व तालुक्यातील गावागावात प्रसिद्ध होत असलेले विविध हिंदी, मराठी ,इंग्रजी दैनिक व साप्ताहिकाचे एजंट, जाहिरात एजंट व पत्रकार किशोर कांता मदन साहू सह गावातील ,परिसरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी, पुढारी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विष्णू मदनकर, प्राचार्य सविता विष्णू मदनकर, पदाधिकारी गोपाल ठोंबरे, गौरीशंकर थोटे, कृष्णा मदनकर, विनोद आकरे, स्वप्निल मदनकर सह समस्त शिक्षक वृंदांनी केले आहे.