नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाद्वारे १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता पर्यंत ज्येष्ठ नागरिक दिनाच्या अनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यरत नागपूर शहरातील संस्थांचा सत्कार डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी समिती सभागृह,सिव्हिल लाईन्स मनपा मुख्यालय येथे करण्यात येणार आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात ज्येष्ठ नागरिक दिनाला नागपूर महानगरपालिकेद्वारे स्तुत्य पुढाकार घेण्यात आलेला आहे.
सत्काराकरिता ज्येष्ठ नागरिकांकरिता शहरातील कार्यरत संस्थांकडून कार्यअहवाल मागविण्यात येत आहे. संस्थांनी वर्षभरात ज्येष्ठ नागरिकांकरिता केलेल्या कार्याचा अहवाल ३० सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजतापर्यंत समाज विकास विभाग, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत चवथा माळा, ‘ए’ विंग, नागपूर महानगरपालिका येथे सादर करावे, असे आवाहन समाज विकास विभागाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी केले आहे. तसेच आरोग्य व्हिभागाच्या सहकार्याने १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते ३ वाजे पर्यंत ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन बुटी दवाखाना ,टेम्पल बाजार,बर्डीयेथे करण्यात आला आहे.