अनुसूचित जाती वस्ती संपर्क अभियानाला सुरूवात

– १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर सेवा पखवाडा

नागपूर :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर हा कालावधी सेवा पखवाडा म्हणून जाहीर केलेला आहे. याअंतर्गत देशात विविध अभियान राबविण्यात येत आहेत. यापैकीच एक ‘अनुसूचित जाती वस्ती संपर्क अभियान’ला २६ सप्टेंबरपासून सुरूवात झालेली आहे. अभियानाच्या अंमलबजावणीसंदर्भात नुकतीच नागपूर शहरात बैठक पार पडली.

अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीच्या दृष्टीने भाजपा उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्यावर अभियान संयोजक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. बैठकीत ॲड. मेश्राम यांनी अभियानाची सविस्तर माहिती स्पष्ट केली.

बैठकीला ह्यावेळी विदर्भ संघटनमंत्री डॉ उपेंद्र कोठेकर, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, शहर भाजप महामंत्री संदीप गवई, रामभाऊ अंबुलकर व विलास त्रिवेदी, माजी मनपा सत्तापक्ष नेते संदीप जाधव, शहर अनुसूचित जाती मोर्चा शहर अध्यक्ष राजेश हाथिबेड, शहर अभियान संयोजक सतीश शिरसवान, प्रभाकर मेश्राम व सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना भाजपा प्रदेश उपाध्यक्ष व अभियानाचे संयोजक ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘अनुसूचित जाती वस्ती संपर्क अभियान’ घराघरात पोहोचविण्यासाठी राज्याचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार कार्य सुरू झाल्याची माहिती दिली. २०१४ ते २०२३ या काळात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अनुसूचित जातीच्या कल्याणार्थ झालेली कामे ‘अनुसूचित जाती वस्ती संपर्क अभियान’च्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यात येईल, असेही अॅड. मेश्राम यांनी सांगितले.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या जनधन योजना, उज्ज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छतेसाठी शौचालयाची योजना या सर्व कल्याणकारी योजनांचा सर्वाधिक लाभ अनुसूचित जातीतील व्यक्तींनाच मिळाला आहे. खऱ्या अर्थाने मोदीनीच अनुसूचित जातीच्या विकासासाठी काम केले आहे. अनुसूचित जातीच्या विकासामध्ये कुठलिही अडचण आल्यास त्यावर तात्काळ मार्ग काढता यावा यादृष्टीने कधी नव्हे ते देशाच्या मंत्रीमंडळात सर्वाधिक १२ अनुसूचित जातीच्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे कार्य सुदूर पोहोचविण्याच्या दृष्टीने मोठा पुढाकार घेतला. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून लंडन येथे बाबासाहेब निवासास असलेला बंगला खरेदी करणे असो की इंदू मिलच्या जागेसाठी केंद्राकडे पाठपुरावा करून ती जागा प्राप्त करणे असो, प्राप्त केलेल्या इंदू मिलच्या जागेवर स्मारकाच्या निर्मिसाठी आवश्यक कार्यवाही ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या हस्ते भूमिपूजन या सर्वांमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे मोठे योगदान आहे. उपमुख्यमंत्री म्हणूनही अनेक प्रलंबित प्रकल्प, कामांना गती देण्याचे काम त्यांनी केले. जपानच्या कोयासन वि‌द्यापीठात बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, रशिया येथे साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे यांचा पूतळा स्थापन करणे, दीक्षाभूमीच्या विकासासाठी २०० कोटीचा निधी तर दीक्षाभूमी, चैत्यभूमीला पर्यटनाचा ‘अ’ मिळवून देणे असो की बाबासाहेबांच्या वापरातील वस्तू, साहित्याचा संग्रह असलेले चिचोली येथील शांतीवन संग्रहालय या सर्वांचा विकास करण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार इतिहास नोंदविली जाणारी बाब आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या या अनुसूचित जातीच्या विकासाच्या संकल्पनेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी साथ मिळालेली आहे. १० हजार कोटींच्या बुद्धिस्ट सर्कीटची या सर्वांमध्ये गडकरी यांनी महत्वाची भूमिका निभावली आहे. हे सर्व कार्य समाजातील वस्त्यांमध्ये शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवून त्यांना पक्षाच्या विचारधारेशी जोडण्यासाठी पुढे या, असे आवाहन अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी बैठकीत केले. डॉ उपेंद्र कोठेकर यांनी समारोपिय मार्गदर्शन केले व अभियानाच्या यशस्वीतेकरिता यथोचित सूचना केल्यात.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

एनसीसीएल के गोविंद पसारी अध्यक्ष, तरूण निर्बाण सचिव चुने गये

Sat Sep 30 , 2023
नागपुर :- नागपूर चेंबर ऑफ कॉमर्स की 86वीं वार्षिक आमसभा शुक्रवार को शाम 4 बजे सेवासदन चौक, सेंटल एवेन्यु स्थित चेंबर के सभागृह में संपन्न हुई। इस मौके पर सभासदों की भारी उपस्थिति रही । मुख्य चुनाव अधिकारी एड. आलोक डागा और चुनाव अधिकारी सीए संदीप जोतवानी की निगरानी में चुनाव संपन्न हुए । इसमें गोविंद पसारी अध्यक्ष, तरुण निर्बाण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com