संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
नागपुर :- बोधिमग्गो सेवा संस्था, बोधिमग्गो महाविहार, भदन्त बोधिविनीत परीसर, भीमनगर – ईसासनी येथे जागतीक बौद्ध संस्कृती नुसार ऐतिहासिक नयनरम्य सजावट करून धम्ममय वातावरणात अविस्मरणीय असा वर्षावास आरंभ सोहळा आदरणीय भीक्खुसंघा चे उपस्थित संपन्न झाला.
सर्व प्रथम आदरणीय पुज्य भदन्त विनयरक्खित महास्थविर यांच्या हस्ते रितसर तथागत बुद्ध, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व भदन्त बोधिविनीत यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून धुप – दिप प्रज्वलन करून उपासक उपासिका यांना उपोषथ अष्ठशील देण्यात आले.
उपरोक्त कार्यक्रमा निमित्त प्रास्ताविक, परित्त सज्झायन, धम्मचक्कपवत्तन सुत्त सज्झायन – भदन्त नाग दिपंकर महास्थविर यांनी केले. भदन्त विनयरक्खित महास्थविर यांनी धम्म देसना दिली. संस्थेचे सचिव, डॉ. भदन्त सीलवंस महास्थविर यांनी संचालन केले.
या निमित्त आदरणीय भीक्खुसंघास भोजनदान – संघदान, उपासक – उपासिकांना सामुदायिक भोजन दान देण्यात आले. या निमित्त आदरणीय पुज्य भदत प्रियदर्शी महास्थविर, डाॅ. भदन्त धम्मोदय महास्थविर, भदन्त ज्ञानबोधी महास्थविर, भदन्त कविसिंदा, जीवनदर्शी, भदन्त महाकश्यप, भदन्त सुजात तिष्य, आदी भीक्खुगण उपस्थित होते.
उपरोक्त कार्यक्रम निमित्त बोधिविनीत परीसर येथे पर्यावरण संरक्षण संवर्धन च्या दृष्टीने शेकडो वृक्ष लागवड करून वृक्षारोपण करण्यात आले. सोबतच गरजू लोकांना वस्त्रदान दिले गेले.
कार्यक्रम यशस्वी करण्या करिता बोधिमग्गो दायक – दायीका सभा, उपासक – उपासिका संघ, बोधिमग्गो संडे स्कूल, बोधिमग्गो वेलनेस सेंटर, बोधिमग्गो कम्युनिटी किचन आदीनी परिश्रम घेतले, या प्रसंगी प्रज्ञा मेश्राम, सिद्धी साखरे, आचल वासनिक, मयुरी खोब्रागडे, आकांक्षा पाटील, प्रज्ञा बागडे, दीक्षा काटकर, अक्षिता रामटेके, असंग नंदेश्वर, तेजस तायडे, सुषमा मेश्राम, शंकरराव निकोसे, अनिल मेश्राम, ज्ञानेश्वर मुंजनकर, सहादेव बांगर, दुर्वास साखरे, निलेश तायडे, आणि मोठ्या संख्येत उपासक – उपासिका उपस्थित होते.