संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- जेव्हा जेव्हा हिमालयावर संकट आले तेव्हा तेव्हा सहयाद्री धावून गेला हा इतिहास आहे आणि याच ऐतिहासिक सत्याची प्रचिती महाराष्ट्रातल्या गावोगावी असलेल्या वीर जवानांच्या अस्तित्वातून येते म्हणून स्वातंत्र्याच्या अमृतकाळात देशाच्या वीर जवानांसह हुतात्मे व सत्याग्रहींचे पुण्यस्मरण प्रेरणादायी ठरत असल्याचे मौलिक प्रतिपादन कामठी नगर परिषदचे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी केले.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून वीर शहीद व स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मानार्थ 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान ‘माझी माती माझा देश’अभियान संपूर्ण देशभरात राबविण्यात येत आहे.या अनुषंगाने कामठी नगर परिषद कार्यालयात ‘मेरी माटी मेरा देश ‘व ‘हर घर तिरंगा’अभियान राबविण्यात येत आहे.त्यानुसार आज कामठी नगर परिषद प्रांगणात सामूहिक ध्वजारोहण करून वीर हुतात्म्यांना नमन करीत कामठी चे स्वातंत्र्य सैनिक रतनलाल पहाडी यांचा शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.तसेच कवडू सुकाजी आष्टणकर,मोहम्मद रफी शेख इदू,प्रभाकर राजाराम खारवडे, सावशील मनीलाल खरडकर,मन्नालाल भूरुमल तिवारी,सदाशिव वैंकटेश वैद्य,श्रीराम रामजीवन शर्मा,उमाशंकर दयाराम रदराबे,उमाशंकर रेवाशंकर पंड्या,रतनचंद इंदरचंद जैन या वीरांच्या शिलालेखाचे अनावरण स्वातंत्र्य सैनिक रतनलाल पहाडी यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी मुख्याधिकारी संदीप बोरकर,उपमुख्यअधिकारी नितीन चव्हाण,स्वास्थ्य अभियंता वीरेंद्र ढोके,स्वास्थ्य निरीक्षक विजय उर्फ गफ्फु मेथीयां, प्रदीप भोकरे .तसेच 500 रोपट्यांचे लागवड करण्यात आले.
याप्रसंगी कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष काशिनाथ प्रधान सह कामठी नगर परिषद चे अधिकारी सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रदीप भोकरे यांनी केले.