नागपूर :- बामसेफ, बीआरसी, डीएस-फोर व बीएसपी चे संस्थापक बहुजन नायक मान्यवर कांशीराम यांचा 17 वा स्मृतिदिन बहुजन समाज पार्टीच्या वतीने आज बसपाच्या नागपुरातील प्रदेश कार्यालयात संपन्न झाला. नागपूर जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अभिवादन सभेत महाराष्ट्र प्रदेश बसपाचे स्थानिक प्रभारी एडवोकेट सुनील सोनटक्के प्रामुख्याने उपस्थित होते.
अभिवादन केल्यावर बसपा कार्यकर्त्यांनी अभिवादन रॅली काढून कपिल नगर चौकातील कांशीरामजी मार्गावरील कांशीरामजींच्या शिलान्यासला माल्यार्पण केले. नंतर ही अभिवादन रॅली कांशीराम टी पॉईंट कामठी रोड येथील मेट्रो स्टेशन जवळ अभिवादन रॅलीचा समारोप करण्यात आला.
महाराष्ट्र प्रदेशच्या सचिव रंजना ढोरे, महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, जिल्हा प्रभारी नरेश वासनिक, जिल्हाध्यक्ष ओपुल तामगडे, माजी जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, विलास सोमकुवर, महिला नेत्या सुरेखा डोंगरे, मा मनपा पक्षनेते जितेंद्र घोडेस्वार आदींनी मान्यवर कांशीराम यांचा जीवन कार्यावर प्रकाश टाकून अभिवादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तर नागपूरचे अध्यक्ष जगदीश गजभिये यांनी तर समारोप माजी मनपा सभापती गौतम पाटील यांनी केला. याप्रसंगी प्रामुख्याने नागपूर जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग, जिल्हा महासचिव प्रताप सूर्यवंशी, जिल्हा सचिव अभिलेष वाहाने, डॉ शितल नाईक, शहर प्रभारी विकास नारायने, उपाध्यक्ष उमेश मेश्राम, माजी नगरसेवक संजय जयस्वाल, महेश सहारे, योगेश लांजेवार, राजू चांदेकर, विश्राम बेडसे, विशाल बनसोड, पश्चिम नागपूरचे भास्कर कांबळे, दक्षिण नागपूरचे जितेंद्र पाटील, मध्य नागपूरचे प्रवीण पाटील, नितीन वंजारी, किरण पाली, बुद्धम राऊत, ऍड विरेश वरखडे, तपेश पाटील, छाया सोमकूवर, सचिन मानवटकर, अंकित थुल, सदानंद जामगडे, सुनील डोंगरे, नरेंद्र उके, सुनील सोनटक्के, प्रकाश कुळमेथे, राजेंद्र सुखदेवे, भानुदास ढोरे, अनिल साहू, अनिल मेश्राम, सुबोध साखरे, राजेश नंदेश्वर, विवेक सांगोळे, रफिक कुरेशी, राज कांबळे, धनराज हाडके, गोवर्धन रामटेके, नितीन डोंगरे, बलवंत राऊत आधी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्या सहित मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.