चिमूर :- विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराचा ज्वर वाढत असतांनाच चिमूर विधानसभा मतदार संघाचे भाजप महायुतीचे उमेदवार आ. कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडीया यांच्या प्रचार सभेसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्या मंगळवार दि. १२ नोव्हेंबर २०२४ ला चिमूर क्रांती भूमीत आगमन होत आहे. देशाचे पंतप्रधान इतिहासात पहील्यांदाच चिमूर नगरीत येत असल्याने मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे.
दरम्यान पंतप्रधानांच्या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली असून भिसी मार्गावर असलेल्या सभास्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आहे. सभेसाठी भव्यदिव्य शामियाना उभारण्यात आला आहे. महायुतीचे उमेदवार आमदार बंटी भांगडिया यांच्या विजयाची हॅट्रिक करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होऊ घातलेल्या सभेची चर्चा सुरू झाली आहे. १९५० पासुन आजपर्यंत प्रधानमंत्री चिमूर क्रांती भूमीत आले नव्हते मात्र महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेसाठी पंतप्रधान नरेन्द्र मोदी चिमूर क्रांती भूमीत येणार असल्याने महायुतीच्या समस्त कार्यकर्त्यांमध्ये मोठया प्रमाणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.