नागपूर :- महाराष्ट्र दिन कार्यक्रमाची रंगीत तालीम आज घेण्यात आली. कस्तुरचंद पार्कवर 1 मे रोजी जिल्हास्तरीय मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी आठ वाजता ध्वजारोहण होणार आहे. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी आज तयारीचा आढावा घेतला. ध्वजारोहणानंतर पालकमंत्री देवेंद्र फडणवीस विविध पथकांचे निरीक्षण करतील. पथसंचलनाचे नेतृत्व सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन थोरबोले करतील. सेकंड इन कमांडर राखीव पोलीस दलाचे उपनिरीक्षक संतोष गिरी असणार आहेत.
पथसंचलनात एकूण 13 पथके सहभागी होणार आहेत. यात नागपूर शहर पोलीस, राज्य आपत्ती प्रतिसाद पथक, नागपूर शहर महिला पोलीस, होमगार्ड (महिला), गृहरक्षक दल (होमगार्ड) आदी पथके सहभागी होणार आहेत. बक्षिस वितरण व नियुक्ती पत्रांचे वितरणही यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
सन 2021-22 मध्ये सशस्त्र सेना ध्वजनिधी उद्दिष्टापेक्षा जास्त निधी संकलन केल्याबद्दल जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाला स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. पोलिस महासंचालक पदकाने सन्मानित नागपूर शहर व ग्रामीण मधील अधिकारी आाणि कर्मचाऱ्यांचा सन्मान,आदर्श तलाठी पुरस्कार, छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार 2018-19 आदी पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल. यासोबत पालकमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र दिन कार्यक्रमाची रंगीत तालीम कस्तुरचंद पार्कवर होणार मुख्य शासकीय समारंभ
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com