संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 30 – भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती आघाडी अध्यक्ष कामठी शहर विक्की बोंबले यांच्या नेतृत्वात प्रबुद्ध नगर प्रवेशद्वार नया गोदाम कामठी येथील अतिक्रमणाबाबत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांना आज दुपारी निवेदन देऊन अतिक्रमण हटविण्याची मागणी करण्यात आली यावेळी भाजपा कामठी शहर महामंत्री उज्वल रायबोले भाजपा कामठी शहर अनुसूचित जाती आघाडी महामंत्री महेंद्र वंजारी भाजपा कामठी शहर उपाध्यक्ष जितेंद्र खोब्रागडे प्रामुख्याने उपस्थित होते.
मुख्य अधिकारी संदीप बोरकर यांनी शिष्टमंडळाला अतिक्रमण हटविण्याचे आश्वासन देऊन याबाबत कारवाई करण्याचे निर्देश अतिक्रमण विभाग नगर परिषद कामठी यांना दिले.