संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 15 :- कामठी शहरातील अतिशय औचित्याचा मुद्दा असलेला कामठी शहरात प्रलंबित असलेला कत्तलखाना तर दुसरीकडे कुरेशी समुदायाच्या मुख्य व्यवसायावर पोलिसांची होत असलेल्या कारवाहिने येथील कुरेशी समूदायाचा मटण विक्री चा व्यवसाय मागील दोन महिन्यांपासून बंद असल्याने येथील कुरेशी समुदायात प्रशासनाविषयी रोष निर्माण झाला असून रोजगाराचा प्रश्न येऊन ठेपला आहे.तेव्हा प्रशासनाने कुरेशी समुदायाचा पुरातन व्यवसाय असल्याची जाण ठेवत कुरेशी समुदायाचा मुख्य रोजगार न हिरावता योग्य मार्ग काढण्याच्या हेतूने कामठी शहरातील कत्तलखाण्याचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत प्रशासनाने पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करून समस्या मार्गी लावण्याचे आशयाचे निवेदन येथील ऑल इंडीया जमेतूल कुरेशी संघटन कामठी च्या वतीने पोलीस उपायुक्त ,जिल्हाधिकारी ला सामूहिक निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद आहे की कामठी शहरात कुरेशी समुदायाची संख्या सात हजाराच्या घरात असून शेतीयोग्य नसलेले गोवंश जनावरांची कत्तल करून आपला उदरनिर्वाह करतात.या समुदायाचे बहुतांश कुटुंब हे भाजी मंडी, कुरेश नगर येथील रहिवासी असून उल्लेखनीय आहे की सन 1952 पूर्वी पासून कामठी नगर परिषद चा एक कत्तलखाना होता आणि व्यापार करण्यासाठी दुकानदारांना परवाने सुद्धा देण्यात आले होते मात्र नगर परिषद प्रशासनाने हा कत्तलखाना पर्यायी जागेत हस्तांतरण करण्यात येणार असल्याचे आश्वासीत करून कत्तलखाना बंद करण्यात आला होता मात्र आजपावेतो पर्यायी जागेत कत्तलखाना सुरू करण्यात आला नसल्याचे वास्तव आहे.
सन 2015 मध्ये राज्य सरकारने पारित केलेल्या आदेशानुसार गोवंश कत्तलबाजीवर प्रतिबंध लावण्यात आला असला तरी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 3मार्च 2016 ला दिलेल्या निकालानुसार कामठीत कत्तलखाना सुरू करण्याचे आदेशीत केले. त्यानुसार कामठी नगर परिषद व नागपूर महानगर पालिका ने पावंनगाव ला डी पी आरक्षित नं 54 व सिटी सर्वे नं 204 मध्ये कत्तलखाना निर्माण करण्याचे सांगण्यात आले.मात्र अजूनपावेतो कत्तलखाना निर्माण करण्यात आलेला नाही.यासंदर्भात संस्थेतर्फे 2018 मध्ये नागपूर खंडपिठात कंटेम्प्ट पिटीशीयन सुद्धा घालण्यात आली.वास्तविकता कामठी शहरातील बहुतांश व्यवसायिकांना एफ एस एस ए आय ने प्रति दिन 50 -50 जनांवरे कापण्याचे परवाने दिले आहेत.तरीसुद्धा कुरेशी समुदायाच्या रोजगारावर गंडांतर आणण्यात येत आहे.तेव्हा कुरेशी समुदायाने रोजगार करायचा कसा?असा प्रश्न उभा होऊन ठाकला आहे. तसेच पशु वैद्यकीय अधिकाऱ्याच्या नियुक्ती अभावी कुरेशी समुदायाच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.
न्यायालयाच्या आदेशान्वये पावंनगाव येथे एका मुदत वेळेत कत्तलखाना निर्माण होण्यास विलंब असल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांची व्यवस्था करण्यात यावी व म्हशी चा मटण चा व्यवसाय कायदेशीर पद्धतीने करण्यास मदत करावी अशी मागणी ऑल इंडिया जमेतूल कुरेश संघटन च्या वतीने तहसीलदार जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त ला दिलेल्या सामूहिक निवेदनातुन करण्यात आले
रोजगाराच्या न्यायिक मागणीसाठी कुरेशी समुदायाचे सामूहिक निवेदन..
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com