नागपुर – रविवार दिनांक 4 संप्टेबर ला संध्याकाळी 7:00 वाजता अरिहंत हॉस्पिटलच्या सभागृहात लायंस क्लब नागपुर आयुर्वेद च्यावतीने शिक्षकदिन समारोहचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे डिस्ट्रिक्ट गवर्नर एम.जे.एफ श्रवण कुमार, पाहूणे पास्ट डिस्ट्रिक्ट गवर्नर एम.जे. एफ.अँड. संदीप खंडेलवाल उपस्थित होते. या कार्यक्रमात नागपुर चे सुप्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटेंट डॉ.टि.एस.रावल याना “उर्दू ” विषयासाठी सतत शिक्षण देण्याबद्दल आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. लॉ.चंद्रकांत सोनटक्के यांना “लायन्स पाठशाला”च्या माध्मामातुन लायन सदस्यांना लायंसचे सिद्धांत आणि त्यांची कार्यपद्धती बद्दल लायन सदस्यांना माहिती आणि प्रशिक्षण देण्याबद्दल “आदर्श शिक्षक” पुरस्कार देण्यात आला. चंद्र कुमार टेकचंदानी गेल्या 30 वर्षो पासुन योगाद्वारे “करो योग रहो निरोगी ” हे निरंतर कार्य करत आहे. त्याना सुध्दा आदर्श शिक्षक पुरस्कार देन्यात आला. क्लबचे वर्तमान सदस्य जे सध्या आयुर्वेद महाविद्यालय प्राध्यापक पदावर कार्यरत आहे. त्याना सुध्दा आदर्श शिक्षक पुरस्कार पुरस्कार देण्यात आला. हयात डॉ. सुभाष वाघे, डॉ. संगीता गुप्ता (जैन) डॉ.विद्या थटेरे, डॉ.वैशाली गणोरकर, डॉ . प्रज्ञा दुहिजोड, डॉ. चैतन्य बारस्कर आदि शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्षा एम.जे.एफ डॉ. पार्वती राणेने दिली. कार्यक्रमचे संचालन ला. डॉ.संजय थटेरेने केले तर आभार सचिव डॉ.भावना भलमे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी डॉ. संजय थटेरे, सतिश राणे, डॉ. देवदत्त खोबरागडे, डॉ. प्रशांत गणोरकर, डॉ. नकुल मरकाम, डॉ. अमिता खोबरागडे, डॉ कल्पना भोवरे, डॉ. सुभाष वाघे, डॉ. विद्या थटेरे, डॉ. संगीता जैन, डॉ.आशिष केसरवानी आदिनी सहकार्य केले.