चंद्रपूर : – चंद्रपूर महानगरपालिका स्वच्छता विभागामार्फत आज वरोरा नाका उड्डाणपुलाची स्वच्छता करण्यात आली. या उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ राहते. वाहने जात असतांना पुलाच्या भिंतीलगत मोठ्या प्रमाणात असलेली रेती, माती उडुन नागरिकांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे स्वच्छता विभागामार्फत कर्मचाऱ्यांद्वारे उड्डाणपुलाची स्वच्छता करण्यात आली. उड्डाणपुलावरील कचरा संकलित करण्यात आला. भिंतीलगत असलेली रेती, माती फावड्याने ओढुन काढण्यात आली. पुलाच्या खालील भागात अनेक ठिकाणी पोस्टर चिपकवुन विद्रुपीकरण करण्यात आले होते, ते सर्व काढण्यात आले व परिसर स्वच्छ करण्यात आला. स्वच्छतेच्या अनुषंगानेच नागरिकांनी रस्त्याने अथवा पुलावरून जाताना कोणत्याही प्रकारची वस्तू, कागद, प्लास्टिक पिशव्या पाण्याच्या बाटल्या न फेकता त्या कचरा घंटा गाडीतच टाकाव्या असे आवाहन स्वच्छता विभागाने केले आहे
वरोरा नाका उड्डाणपुलाची स्वच्छता
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com