वाडी न.प.तर्फे स्पर्धकांना बक्षिस वितरण ; उत्कृष्ट उपक्रमशील विध्यार्थ्यांचा गौरव !
वाडी (प्र) : नगर परिषद वाडी तर्फे स्वच्छ भारत अभियान २.० व स्वच्छ सर्वेक्षण–२०२२ अंतर्गत पोष्टर चित्रकला स्पर्धा,भिंतीचित्र स्पर्धा,जिंगल स्पर्धा,लघुचित्रफीत स्पर्धा व पथनाट्य स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करून वाडी शहरातील शाळा-महाविद्यालय, हॉस्पिटल,हॉटेल,निवासी संकुल,मार्केट असोसीएशन,शासकीय कार्यालय यांचे स्वच्छतेबाबत मूल्यांकन करून गुणानुक्रम ठरविण्यात आला होता.तसेच स्वच्छ इंनोव्हेशन टेकनोलॉजी चॅलेंज स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या सर्व स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच नगर परिषद कार्यालयात संपन्न झाला.न.प.उपमुख्याधिकारी रत्नमाला फटिंग यांच्या अध्यक्षतेखाली स्वच्छ सर्वेक्षण ब्रॅण्ड एम्बेसिडर नरेशकुमार चव्हाण,पोलिस निरीक्षक ललिता तोडासे यांचे हस्ते गुणानुक्रमे उत्कृष्ट उपक्रमशील स्पर्धकांना सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र व रोपटे देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी स्वच्छता अभियंता सुषमा भालेकर,शहर समन्वयक पिंकेश चकोले,स्वच्छता निरीक्षक धनंजय गोतमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धकांचा गौरव करण्यात आला.बक्षीस वितरण कार्यक्रमाचे संचालन योगेश जहांगिरदार यांनी केले.सदर स्पर्धेतील गुणानुक्रमे उत्कृष्ट स्पर्धकांमध्ये
पोष्टर चित्रकला स्पर्धा प्रथम -अमीषा प्रभाकर हांडे, स्माईली गोयल,आशना निखिलेश मून,भिंतीचित्र स्पर्धा प्रथम – साहिल नामदेव मोरे,जिंगल स्पर्धा प्रथम- स्वरा तांबोली,लघुचित्रफीत स्पर्धा-आदिती विजय बुरडे,पथनाट्य स्पर्धा- सौरवी धिरज पिल्लई,अभय मिश्रा,स्वच्छ शाळा प्रथम- जिंदल पब्लिक स्कूल, स्वच्छ शासकीय कार्यालय प्रथम-पोलिस स्टेशन वाडी, स्वच्छ हॉस्पिटल-हाडोळे हॉस्पिटल,स्वच्छ हॉटेल प्रथम-हॉटेल सोलिसीटर,स्वच्छ निवासी संकुल मध्ये लाइफ स्टाइल अपार्टमेंट, स्वच्छ मार्केट असोसीएशन- शिला कॉम्प्लेक्स, स्वच्छ इंनोव्हेशन टेकनोलॉजी चॅलेंज मध्ये देवांश मानापुरे या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावून नदी,तलावातील दूषित झालेले पाणी शुद्ध करणारे सौर ऊर्जेवर चालणारे उपकरण प्रस्तुत करून सर्वांचे लक्ष वेधुन घेतले होते.वाडी नप.ने जाहीर केलेल्या या स्पर्धेत शहरातील लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकानी मोठया प्रमाणात उस्फुर्तपणे सहभागी होऊन आपापल्या संकल्पना व कौशल्य प्रकट केल्याबद्दल स्वच्छता निरीक्षक धनंजय गोतमारे यांनी सर्वांचे आभार मानले.