नागपूर : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त 3 डिसेंबर हा दिवस स्वच्छ दूध उत्पादन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. डॉ.अनिल भिकाने, संचालक विस्तार शिक्षण, म.प.म.वि.वि यांच्या मार्गदर्शनात स्वच्छ दूध उत्पादन दिवस निमित्त कृषी विज्ञान केंद्र, दूधबर्डी, ता.कळमेश्वर, जि. नागपूर यांच्या वतीने स्वच्छ दूध उत्पादनाबद्दल पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमात डॉ. सारीपुत लांडगे, वरिष्ठ वैज्ञानिक तथा प्रकल्प समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, दूधबर्डी, नागपूर यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्याबद्दलच्या मार्गदर्शनात दुभत्या जनावरांचे संवर्धन व व्यवस्थापन करताना मुक्त संचार गोठा पद्धत ही कमी मनुष्यबळ, कमी खर्चाची आणि उपयुक्त आहे याबद्दल मार्गदर्शन केले.
डॉ. प्रभाकर टेंभुर्णे, सहाय्यक प्राध्यापक, सूक्ष्मजीव तथा जैवतंत्रज्ञान विभाग, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर यांनी कासदाह निदान चाचणीचे प्रात्येशिक दाखविले. दूध काढताना घ्यावयाची काळजी, दुभत्या जनावरांमध्ये होणाऱ्या स्तनदाह या रोगाचे लक्षण, व्यवस्थापन आणि स्तनदाहामुळे होणारे नुकसान याबद्दलही शेतकऱ्यांना माहिती दिली. श्रीमती डॉ. एरोस सोमकुवर, पशुधन विकास अधिकारी, धापेवाडा (कळमेश्वर) यांनी स्वच्छ दूध उत्पादनासाठी पशुधनाच्या आरोग्याचे महत्त्व विषद केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कृषी विज्ञान केंद्र, दूधबर्डी, ता. कळमेश्वर, जि.नागपूर चे डॉ.अमोल हरणे, विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण) आणि श्री तुषार मेश्राम , विषय विशेषज्ञ (विस्तार शिक्षण) डॉ.अश्विनी गायधनी, विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या), कु.मयुरी ठोंबरे, विषय विशेषज्ञ ( गृह विज्ञान) यांनी परिश्रम घेतले