निळया आकाशासाठी स्वच्छ हवा दिन होणार साजरा, मनपातर्फे दुचाकी इलेकट्रीक वाहन व सायकल रॅली

चंद्रपूर :- हवाप्रदूषणाच्या दुष्परिणामांबाबत नागरीकांमध्ये जागृती निर्माण होण्यासाठी आणि त्यादृष्टीने कृती करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे ‘निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवा’ (क्लीन एअर फॉर ब्लू स्काय) दिन गुरुवार ७ सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. यानिमित्त सकाळी ९ वाजता दुचाकी इलेकट्रीक वाहन व सायकल रॅली काढली जाणार असुन त्याद्वारे जनजागृती केली जाणार आहे.

संयुक्त राष्ट्राव्दारे ७ सप्टेंबर रोजी इंटरनॅशनल डे ऑफ क्लीन एअर फॉर ब्ल्यू स्काय दिवस साजरा करण्याचे जाहिर करण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धन आणि वायु प्रदुषण कमी करण्याच्या दृष्टीने हे एक महत्वाचे पाऊल आहे. या दिनाचे उद्दीष्ट म्हणजे आरोग्य, उत्पादकता, अर्थव्यवस्था आणि पर्यावरण याच्या दृष्टीने स्वच्छ हवेचे महत्त्व पटवून देणे. हवेच्या गुणवत्तेचा इतर पर्यावरणीय / विकासात्मक आव्हानांशी असलेला जवळचा संबंध दर्शविणे व वायू प्रदूषण हा एक पर्यावरणीय धोका आहे, जो वर्तमान आणि भावी पिढ्यांवर परिणाम करतो याची जाणीव सर्वांमध्ये निर्माण करणे होय.

फुफ्फुसाच्या कर्करोगाला कारणीभूत ठरणारी प्रदूषित हवा पर्यावरणाचीही कायमस्वरुपी हानी करत असल्याने त्याकडे अधिक दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरेल. हवा प्रदूषणाचे धोके ओळखुन पर्यावरणपुरक वाहनांचा वापर करणे, वृक्षलागवड करणे,कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करणे, नूतनीकरण योग्य ऊर्जेचा वापर करणे इत्यादी गोष्टी प्रकर्षाने करणे आवश्यक आहे.

चंद्रपूर महानगरपालिका कार्यालय ते जटपुरा गेट ते मनपा कार्यालय असा रॅलीचा मार्ग राहणार असुन ज्या शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होतील त्या शाळेस प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक देऊन प्रमाणपत्र दिले जाणार आहे. रॅलीत मोठ्या संख्येने नागरीकांनी सहभागी होऊन पर्यावर संरक्षण व संवर्धनात हातभार लावण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करा - उपमुख्यमंत्री अजित पवार

Wed Sep 6 , 2023
मुंबई :- पुणे जिल्ह्यातील लोहगाव परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने लोहगाव येथील सहा एकर जागेत १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय व निवासस्थानांचे बांधकाम करण्यात येत आहे. सद्यस्थितीत ९० टक्के बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित कामे जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. पुणे जिल्ह्याच्या लोहगाव (ता. हवेली) येथील उपजिल्हा रुग्णालय व निवासस्थान बांधकामाचा आढावा उपमुख्यमंत्री अजित […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com