नागपूर :- कांशीराम यांचे दक्षिण नागपूर येथील रामेश्वर कार्यालय या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या नागपूर शहर कार्यकारणीच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आले. दोन लहान शाळकरी मुलांच्याहस्ते मान्यवर काशीराम यांच्या वाढदिवसाच्या दिनानिमित्त केक कटिंग करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये नागपूर महिला जिल्हाप्रमुख सुरेखा डोंगरे होते. कार्यक्रमाचे मुख्य प्रवर्तक व मार्गदर्शक ओपुल तामगाडगे, नागपूर शहर प्रभारी व विकास नारायणे शहर प्रभारी नागपूर उपस्थित होते. विशेष उपस्थिती म्हणूनशहर सदस्य विशाल बनसोड धनराज हाडके सुंदर भालावी, सुमित जांभुळकर पंकज नाखले नागेंद्र पाटील, मनोज सोमकुवर आर्यन बागडे, अश्विन पाटील इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. त्याचप्रमाणे नागपूर माजी शहर सचिव विलास मून शंकर थूल, आशिष आवले,वर्षा वाघमारे शुभेच्छा व मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष भाषणात सुरेखा डोंगरे यांनी फुले, शाहू, भीमा, नंतर बहुजनांचा खरा इतिहास समाजापर्यंत पोहोचण्याचे कार्य मान्य कांशीराम यांनी केले. आणि त्याच कार्याला गती देण्याकरिता आजच्या बसपाच्या सर्व कार्यकर्त्यांनी जबाबदारी प्रामाणिकपणे स्वीकारली तर तेव्हाच बहुजनांच्या हातात खरी सत्ता येऊ शकते असे उद्गारवाचक त्यांनी आपल्या मार्गदर्शनात आपले मत मांडले. ओपुल तामगाडगे प्रभारी यांनी आपल्या मार्गदर्शनात कार्यकर्त्यांना संबोधित करताना ज्याप्रमाणे मान्यवर कांशीराम यांनी फुले शाहू आंबेडकरी मिशन करिता आपले संपूर्ण आयुष्य मोमेंट करिता वेचले आणि खऱ्या अर्थाने सत्ताधारी जमात बनण्याकरिता एससी एसटी ओबीसी समाजाला एकत्र करून त्यांच्यामध्ये जागृती निर्माण केली आणि त्याच जागृतीच्या जोरावर उत्तर प्रदेशात चार वेळा सरकार बनवून दाखवले आणि म्हणूनच आजचा हा ओबीसी समाज जागृत झाल्यामुळे आपले हक्क आणि अधिकार आज मागताना दिसत आहे आणि हे सर्व मान्य कांशीराम यांच्या अथक परिश्रमामुळे आणि त्यागामुळे होऊ शकले आहे. आणि म्हणूनच त्यांची संकल्पना होती की व्यवस्था परिवर्तन होऊ शकते, सत्ता परिवर्तन होऊ शकते, केवळ आत्मविश्वासाची आवश्यकता आहे आणि ज्या वेळेस आत्मविश्वास प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये महापुरुषांबद्दल जागृत होणार तेव्हाच खऱ्या अर्थाने बहुजनांची सरकार बनल्याशिवाय राहणार नाही. शहर प्रभारी विकास नारायणी यांनी सुद्धा आपल्या मार्गदर्शनात मान्यवर कांशीराम यांच्या इतिहास जन्मापासून तर शेवटच्या क्षणापर्यंत मुव्हमेंट साठी ओजोळ संघर्ष, आंदोलनासाठी समर्पित त्याग असा महापुरुष पुन्हा या पृथ्वीतलावर उद्या येणार नाही आणि म्हणूनच बहन मायावती आज आमच्यासाठी जिवंत महापुरुष आहे त्यामुळे त्यांचे महत्त्व समजून सरकार बनवण्याच्या व महानगरपालिकेमध्ये सत्ता प्रस्थापित स्थापना करिता कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील राहावे असे प्रतिपादन त्यांनी आपल्या व्यक्तिमत मांडले. याप्रसंगी नागपूर शहर वार्ड कमिटीच्या सदस्यांमध्ये, शंकर गजभिये, युवा रोहित तामगाडगे, सायली श्रीकांत फुले, फोपरे, दक्षिण विधानसभेचे जितू पाटील, दक्षिण विधानसभेचे माजी अध्यक्ष नितीन वंजारी, वरिष्ठ बसपा कार्यकर्ता संभाजी लोखंडे, विनोद नारनवरे यांनी सुद्धा कांशीराम यांच्या फोटोला पुष्प फुलांच्या वर्षाव करून शुभेच्छा दिल्या.