नागपूर :-५ एप्रिल रोजी दिल्ली रामलीला मैदान येथे झालेल्या शेतकरी शेतमजूर कामगारांच्या मोदी सरकारच्या जनविरोधी नीती विरोधात झालेल्या संघर्ष रॅलीमध्ये नागपूर आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सीआयटीयू) तर्फे ३५० आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी सहभाग नोंदवून रामलीला मैदान येथे तीव्र नारे निदर्शने करून दिल्लीकराचे लक्ष वेधले. ३ एप्रिल रोजी, केरळ एक्सप्रेसने नागपूर येथून शेकडो आशा वर्कर व गटप्रवर्तक दिल्ली करिता रवाना झाल्या. मोर्चेकरी दिल्लीला रवाना होण्याच्या आधीच नागपूर स्थानकावर मोदी सरकारच्या विरोधात नारे निदर्शने करून प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले.
आशा -गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, किमान वेतन २६ हजार रुपये मिळावे, चार कामगार विरोधी नवीन कायदे रद्द करावे, विविध क्षेत्रांमध्ये कामगारांची कंत्राटी पद्धतीने भरती बंद करावी, तीन शेतकरी विरोधी कायदे रद्द करून मिनिमम सपोर्ट प्राईज नुसार शेतकऱ्यांना सवलत द्यावी, शेत मजुरांना पेन्शन लागू करावी.
या मागण्याकरता लाखोच्या संख्येत शेतकरी, शेतमजूर व कामगार दिल्लीच्या रामलीला मैदानामध्ये एकत्रित झाले. मोर्चाचे नेतृत्व कॉ.राजेंद्र साठे, कॉ.प्रीती मेश्राम, कॉ.उषा मेश्राम, कॉ.सुनंदा बसेशंकर, कॉ. माया कावळे, कॉ.प्रमोद कावळे, कॉ.नासिर खान, मोनिका गेडाम, रेखा पानतावणे, सरिता ठवरे, सारिका जावळे, प्रतिमा डोंगरे यांनी केले.