नागपूर :-सी.आय.टी.यू तर्फे कोव्हिड 19 योध्दयांचा म्युनिसिपल कामगार एकता युनियनच्या नेतृत्वात विधानसभेवर राज्यव्यापी मोर्चा कोव्हिड १९ महामारीच्या काळात हया महामारीला हरविण्यासाठी राज्यभरात आरोग्य क्षेत्र व इतर क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणात नर्सेस, अटेंन्टड, लॅब टेक्नीशियन्स्, कॉम्पुटर ऑपरेटर्स, सफाई कर्मचारी, वार्ड बॉईज, अम्बुलंस व इतर वहन चालक, शववाहक, आशा कर्मचारी व गटप्रवर्तक, डॉक्टर्स, पोलीस कर्मचारी हया पदावर रुजू करण्यात आलेत व हयांनी आपला जीव धोक्यात घालून कर्मचाऱ्यांनी कार्य केले तसेच बरेच कोव्हिड योध्दे हे बळी पडलेत. कोव्हिड१९ चा धोका कमी होताच हया सर्व कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यात आले. हे कर्मचारी कोणत्याही नियमित कामाचे तास न ठरलेले असतांना १८-१८ तास कार्यरत होते व त्यांची कोव्हिड १९ व इतर रुग्णांची सेवा केली. स्वास्थ क्षेत्रामध्ये सध्या भरपूर रिक्त जागा असून सुध्दा हया कर्मचाऱ्यांना सेवेसाठी पाचारण करण्यात येत नाही, या कोव्हिड योध्यांच्या न्याय्य मागण्यांकरीता उद्या सोमवार दिनांक १९ डिसेंबर २०२२ रोजी विधानसभेवर खालील मागण्या करीता मोर्चा आयोजीत करण्यात आला आहे.
१.कोव्हिड योध्दा हयांना सेवेत कायम करावे,
२. कोव्हिड भत्ता ताबडतोबीने देण्यात यावा व सानुग्रह अनुदान मिळावे
३.रिक्त जागांमध्ये भरती करतांना कोव्हिड योध्दा हयांना प्राधान्याने सेवेत सामावल घेण्यात यावे.
४.आशा कर्मचाऱ्यांना कोव्हिड काळासाठी स्पेशल भत्ता ताबडतोबीने देण्यात यावा .
५.आशा कर्मचारी व गटप्रवर्तक हयांना किमान वेतन देण्यात यावे, तसेच कोव्हिड योध्दा जे काढून टाकण्यात आलेत त्यांना महिन्याला किमान सानुग्रह अनुदान देण्यात यावे व हे अनुदान व किमान वेतन देण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रात पेट्रोल-डिजेल व दारु उत्पादनांवर कोव्हिडयोध्दा रु १/- सेस लावण्यात येतून हा रेव्हेन्यु जमा करण्यात यावा. या मोर्चाचे नेतृत्व मनोज यादव, जगनारायण गुप्ता, सरचिटणिस, म्युनिसिपल कामगार एकता युनियन, मोहम्मद ताजुद्दीन, अध्यक्ष व दिलीप देशपांडे, सिटू राजेन्द्र साठे, सचिव, प्रिति मेश्राम, सचिव, सिटू व आशा युनियन विठठल जुनघरे, अभिजित कुलत, नितिन ढोबळे, सचिव सिटू नागपूर हे करतील मोर्चामध्ये असंख्य नर्सेस, लॅब टेक्निशियन्स्, सफाई कामगार, वार्ड बॉईज, कर्मचारी सामील होतील.