संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– जि प शाळा कांद्री च्या मागे भर उन्हाळयात ही पुरपरिस्थिती
कन्हान :- वेकोलि कामठी खुली कोळसा खदानच्या दगानीने घराना हादरे बसुन घराचे नुकसान होत असल्याने दगान क्षमता कमी करून माती डम्पींगमुळे कांद्री नाला बुजल्याने लोकवस्ती लगत नाल्यात वेकोलि व्दारे सोडण्यात येणारे दुषित पाणी साचुन दुर्गंधी पसरून रोगराई चा प्रसार होऊन नागरिकाचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकरता येत नसल्याने आपण शासन स्तरावर पत्र व्यवहार करून संबधित समस्या तातडीने सोडविण्यास कांद्री येथील सुज्ञ नागरिकांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी, नगर पंचायत कांद्री याना निवेदन देऊन मागणी केली आहे.
जि. प. शाळा कांद्री च्या पाठीमागे असलेल्या नाल्याचा बाजुला वेकोली कामठी खुली खदान व्दारे होत असलेली उच्च क्षमतेची दगान व माती डम्पिंग थांबविण्याकरिता गावातील नागरिका व्दारे निवेदने देण्यात आलेले होते. परंतु आज पर्यंत वेकोली कामठी खुली कोळसा खदान व्दारे करण्यात येणारी दगान ची क्षमता कमी न केल्याने लोकवस्तीतील घराना हादरे बसुन घराना भेंगा पडुन नुकसान होत आहे. तसेच वेकोली ने माती डम्पिंग करणे थांबविले नसल्याने दखने हायस्कुल कांद्री-कन्हान च्या मागे असलेला नाला पूर्ण पणे बंद झाल्याने नाल्यात येणार वेकोलिचे कोळसा मिश्रीत पाणी जि.प. शाळेचा मागे तसेच गावात असलेल्या घरापर्यंत साचुन थांबलेले असुन पाणी वाहुन न जाता साचल्याने पाण्यामुळे परिसरात दुर्गंधीचे प्रमाण वाढुन बारीक डास सुद्धा वाढलेले आहेत. यामुळे परिसरात रोगराई चा प्रसार होऊन नागरिकाचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकरता येत नाही. वेकोलि दगान मुळे (दि.२८) ऑगस्ट २०२३ ला हरिहर नगर कांद्री येथील दिवसा घर कोसळुन कमलेश कोठेकर वय ३५ वर्ष व सहा महिन्याची मुलगी यादवी या बाप लेकी चा मुत्यु झाला होता.
या सर्व समस्याचे गांभिर्य लक्षात घेऊन वेकोलि कामठी खुली कोळसा खदान च्या दगान ची क्षमता कमी करून कांद्री लगत डम्पींग बंद करून कांद्री च्या नाल्याची वेकोलि व्दारे सफाई करून नाल्यातील पाणी प्रवाह सुरळित करावा. जेणे करून गावा लगत भर उन्हाळ्यात पाणी साचुन पुर परिस्थिती निर्माण होणार नाही. याची शासन स्तरावर योग्य कार्यवाही करून ही समस्या तात्काळ सोडवुन नागरिकाना भय मुक्त करण्यात यावे. असे निवेदन मा. मुख्याधिकारी नगरपचायत कांद्री हयाना माजी सरपंच बळवंत पडोळे यांच्या नेतुत्वात, महेश झोडावने, गणेश सरोदे, अवधेश सुर्यवंशी, सुनिल चाफले, गब्बर इंगोले , क्रिष्णा खांदारे, एकनाथ खांदारे, मीला मंगलसिह यादव, कुभलाल यादव, प्रताप वाल्हे, मनोज खडसे, रत्नाकर मस्के, गोविंद परिहार, स्वप्निल चिखले आदी सह सुज्ञ नागरिकांच्या शिष्टमंडळाने निवेदन देऊन केली आहे.