गावाच्या स्वच्छतेसाठी नागरिकांचा सहभाग उत्साहवर्धक – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

– स्वच्छता संवाद कार्यक्रमास सुमारे 2,53,162 नागरिकांचा सहभाग

मुंबई :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वच्छ भारत अभियान टप्पा-2 अंतर्गत राज्यासह संपूर्ण भारत देश स्वच्छ करावयाचा आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यात “स्वच्छता ही सेवा” या अभियानांतर्गत “कचरामुक्त भारत” हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये नागरिकांचा सहभाग उत्साहवर्धक असल्याचे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

स्वच्छ भारत दिवस 2023 च्या निमित्ताने 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत स्वच्छता ही सेवा (SHS) या अभियानांतर्गत “कचरामुक्त भारत” उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने मंत्री  पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय स्वच्छता संवाद कार्यक्रमाचे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रधान सचिव संजय खंदारे, अभियान संचालक शेखर रौंदळ, अवर सचिव चंद्रकांत मोरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित अधिकारी, नागरिक उपस्थित होते.

मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, स्वच्छ भारत अभियान टप्पा-2 अंतर्गत राज्यातील 24,340 गावे म्हणजेच 60 टक्क्यांपेक्षा अधिक गावे हागणदारी मुक्त (ODF Plus) जाहीर झाली आहेत. ही बाब राज्यातील नागरिकांसाठी निश्चितच दिलासादायक आहे, या पंधरवड्यानिमित्त दैनंदिन स्वच्छता विषयावर उपक्रम राबविण्याबाबत जिल्ह्यांनी उत्तम नियोजन केले आहे. त्या अनुषंगाने राज्यात सद्य:स्थितीत 10,188 उपक्रम राबविण्यात आले असून सुमारे 43,85,441 नागरिकांनी सहभाग नोंदवला आहे.

दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे झालेल्या स्वच्छता संवाद कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, सरपंचांनी त्याचा जिल्हा, तालुका, गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबाबत आपले अनुभव सांगितले. त्यांनी केलेल्या उपाययोजना राज्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहेत. या कार्यक्रमात प्रशासनाबरोबर नागरिकांचा सहभाग मोलाचा ठरत आहे. ही बाब महाराष्ट्र शासनासाठी उत्साहवर्धक आहे. आपण सर्व जण एकत्र येवून राज्याला स्वच्छ राज्य म्हणून मार्च 2024 पर्यंत घोषित करण्याबाबत प्रयत्न करु या, असे आवाहन मंत्री पाटील यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बाप्पांच्या निरोपाची तयारी पूर्ण ; २११ ठिकाणी ४१३ विसर्जन तलाव, ४ फुटावरील मूर्तींच्या विसर्जनाची व्यवस्था कोराडी येथे

Thu Sep 28 , 2023
नागपूर :- गुरूवारी २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला श्रीगणेशाचे विसर्जन होणार आहे. नागपूरकरांनी स्थापना केलेल्या लाडक्या बाप्पांच्या निरोपाची मनपाद्वारे तयारी पूर्ण झालेली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात शहरातील दहाही झोनमधील वेगवेगळ्या २११ विसर्जनस्थळी एकूण ४१३ कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आलेली असून यामध्ये १९ फिरत्या विसर्जन तलावांचा देखील समावेश […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com