संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 14 – ग्रामीण भागातील नागरिकांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ घेऊन आत्मनिर्भर होण्याचे आवाहन आदिवासी आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी तालुक्यातील लिहीगाव ग्रामपंचायत च्या वतीने आयोजित रोजगार मिळावा, शिलाई मशीन वाटप, गुणवंत विद्यार्थी व सेवाभावी नागरिकांच्या सत्कार प्रसंगी मार्गदर्शन करताना व्यक्त केले कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी आयुक्त रवींद्र ठाकरे यांचे हस्ते दीप प्रज्वलन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आले यावेळी नागपूर जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य अधिकारी डॉ कमलकिशोर फुटाणे, रोजगार संघाचे अध्यक्ष संजय नाथे ,सचिव उद्धव साबळे, कामठी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अंशुजा गराटे ,नवीन कामठीचे ठाणेदार संतोष वैरागडे ,कडोलीच्या सरपंच प्रांजल वाघ, कापसीचे सरपंच शामराव आडोळे ,लिहीगाव ग्रामपंचायतचे सरपंच गणेश झोड , उपसरपंच सुनीता ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र निकाळजे, सुषमा ठाकरे, विशाखा बोरकर, हरीश निखालजे ,सुनीता सोनटक्के, ग्रामविकास अधिकारी श्याम उचेकर, माजी सरपंच जामुवत ठाकरे ,शांताराम ठाकरे ,रोहन हिवसे, रामू ढेगरे, अविनाश ठाकरे ,प्रशांत बोरकर उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान पाहुण्यांचे हस्ते लिहीगाव ग्रामपंचायत च्या वतीने सामान्य फंडातून 52 महिलांना शिलाई मशीनचे वाटप ,दहावी बारावी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी सत्कार व सेवाभावी सर्पमित्र व सामाजिक कार्यकर्ते दीपक वाघ योगेश गायधने नामदेव ठाकरे यांचा शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमात प्रमुख अतिथीनी मार्गदर्शन करताना शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन प्रत्येक नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांच्या मोठ्या प्रमाणात लाभ घेऊन आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार अधिकारी मनीष दिघाडे यांनी केले संचालन ग्रामविकास अधिकारी श्याम उचेकर यांनी केले व आभार प्रदर्शन सरपंच गणेश झोड यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.