– ज्वलंत समस्या तात्काळ न सोडविल्यास नागरिकांचा जनआंदोलन ईशारा.
कन्हान :- नगरपरिषद अंतर्गत शहरातील लोकवस्ती मध्ये दुषित पाणी पुरवठा, मुख्य व नगरातील रस्त्या वरील लाईट बंद, गुजरी व आठवडी बाजार महामार्गा वर लागतो, अश्या अनेक जिवघेण्या ज्वलंत समस्या विषयी नगरपरिषद मुख्याधिकारी मा. दिपक घोडके यांचेशी नागरिकांनी भेटुन चर्चा करून तात्काळ न सोडविल्या जनआंदोलनाचा ईशारा सुध्दा देण्यात आला आहे.
मागिल कित्येक वर्षीपासुन कन्हान-पिंपरी नगरपरिषद अंतर्गत पिण्याचा पाण्याचा पुरवठा कर ण्यारा पाणी टाक्या नादुरूस्त अवस्थेत असुन पिण्याचे पाणी अस्वच्छ व ब्लिचिंग पावडर औषध न टाकता थेट दुषित पिण्याचे पाणी राहत्या नागरी वस्तीत पुरवठा होत असल्याने नागरिकाचे आरोग्य धोक्यात येत असुन यावर तात्काळ पाहणी करून उपाययोजना करण्यात याव्या. तसेच राहत्या रहवासी नागरी वस्ती तील व अनेक महिन्यापासुन रहदारी महामार्ग व रस्त्या वरील स्ट्रीट लाइट बंद असुन रात्री सर्वत्र अंधकार राह त असल्याने वाहन चालक दुर्घटना ग्रस्त होत असुन सुध्दा याकडे नगरपरीषद प्रशासन कान्हाडोळा करीत आहे. दैनदिन भाजीपाला गुजरी व आठवडी बाजार हा महामार्गावर भरत असुन सुद्धा नगरपरिषद प्रशास न जाणुनबुजून दुर्लक्ष करित आहे. कुठलाही प्रकारची अनुचित जिवघेणी घटना घडु शकते अश्या अनेक नागरी ज्वलंत जीवघेण्या समस्येने संपुर्ण नागरिक त्रस्त असल्याने या ज्वलंत समस्यावर नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ उपाय योजना करण्यात याव्या अन्यथा जनआंदोलन उभारण्यात येईल. याकरिता नागरिकांनी नगरपरिषद मुख्याधिकारी दिपक घोडके याची भेट घेऊन चर्चा करून सांगितले. याप्रसंगी प्रशांत बाजीराव मसार, मधुकर गणवीर, दिपक तिवाडे , विनोद येलमुले, लाला कडणायके, मोरेश्वर भोयर, विनोद अगुटलेवार, रमेश ठाकरे आदी सह नागरिक उपस्थित होते.