चंद्रपाल चौकसे आयेंगे, रोजगार दिलायेंगे”

रामटेक :- दिनांक 29-10-2024 रोज मंगळवारला तहसील कार्यालय रामटेक येथे गोरगरिबांचे कैवारी, महिला सक्षमीकरणासाठी निशुल्क प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करणारे, रोजगार मेळावा आयोजित करुन हजारो तरुण-तरुणीना रोजगार देणारे, आजपर्यंत 1341 जोडप्यांचे निशुल्क सामूहिक विवाह लावून देणारे, वेळोवेळी गरिबांची आर्थिक मदत करणारे, समाजसेवक चंद्रपाल चौकसे (पर्यटक मित्र, संस्थापक रामधाम तीर्थ, मनसर) यांनी हजारो कार्यकर्ते व समर्थकांचा उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज भरला. त्यानिमित्त जाहीर सभा घेण्यात आली व नंतर शांती मंगल कार्यालय, बस स्टॅड, रामटेक ते तहसील कार्यालय रामटेक पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याला माल्यार्पण करुन भव्य नामांकन रैली काढण्यात आली. रैलीत पदाधिकारी, कार्यकर्ता, समर्थक, तरुण युवक – युवती, महिलासह, रामटेक विधानसभेतील समस्त जनता जनार्दन आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपला हक्काचा माणूस व “चंद्रपाल चौकसे, आयेंगे रोजगार दिलायेंगे” च्या नाऱ्याने सर्व शहर दुम-दुमून गेले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

फलॅश मॉबव्दारे मतदानाचा संदेश

Thu Oct 31 , 2024
– त्रिर्मुती चौकात सादरीकरण भंडारा :- गेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्हयात 67.04 टक्के मतदान झाले. शहरी भागात मतदानाविषयी असणारी अनास्था आढळून आल्याने जिल्हयात मोठया प्रमाणावर मतदान जागृतीचे कार्यक्रम सुरू आहेत.त्यातच काल शहरातील मुख्य त्रिर्मुती चौकात फलॅश मॉबव्दारे मतदान करण्याचा प्रभावी संदेश देण्यात आला. या फ्लॅश mob मधे महिला समाज शाळेचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.संजय कोलते, मुख्य कार्यकारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com