कन्हान :- सुख-शांती- समाधान संस्था नागपुर व्दारे कन्हान-तारसा रोड स्थित कृष्णराव लॉन येथे रविवारी (दि.१२) पासुन निःशुल्क योग विद्या शिबिराची सुरूवा त करण्यात आली असुन कन्हान परिसरातील महिला, पुरूष नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
सुख-शांती- समाधान संस्था नागपुरच्या व्दारे कन्हान-तारसा रोड स्थित कृष्णराव लॉन येथे संस्थेचे मार्गदर्शक तथा योगगुरू सचिन माथुरकर व सहयोगी प्रमोद गजापुरे, शीला केळापुरे हे कन्हान शहरवासीया ना योग ज्ञान विद्येचे विविध व्यायाम शिकवित योग प्रशिक्षणाने विविध आजारापासुन मुक्तीचे धडे देत आहेत. हे योग शिबिर (दि.१२ ते २५ ) जानेवारी पर्यंत म्हणजे १४ दिवस रोज सकाळी ६.३० ते ७.३० पर्यंत नियमित सुरु असणार आहे.
शिबिरात प्रशिक्षक राजेंद्र वानखेडे आणि संजय गोयल हे देखील योग विद्येचे प्रशिक्षण देत आहेत. या योग शिबिरात निरोगी होण्या च्या विविध व्यायामा चे प्रशिक्षण मिळत असल्याने कन्हान शहरातील पुरूष, महिला, तरूण व तरूणी बहु संख्येने लाभ घेत नागरिक मोठया प्रमाणात उत्तम प्रतिसाद देत आहत. कन्हान चे योगाचार्य डॉ. मधुकर धोपडे, सचिन माथुरकर, शिबीरांचे संयोजक ओमप्रका श काकडे, दिलीप ठाकरे, डॉ. श्रीकृष्ण जामोदकर, राधा काकडे, आशा खंडेलवाल, छाया नाईक, सुनिता येरपुडे, मिलिंद पोपळकर, उमेश निवळ, जितेंद्र चौधरी , शेखर ठवकर आदी शिबीराच्या यशस्विते करिता सहकार्य करित आहेत.