नागपूर :- पोलीस ठाणे ईमामवाडा हद्दीत, प्लॉट नं. २५५, ऊंटखाना, रमाई बौध्द विहारा जवळ, ईमामवाडा, नागपूर येथे राहणारा सराईत गुन्हेगार नामे ऋषी भाऊराव हाडके, वय २२ वर्षे हा आपले परिसरातील लोकांना दमदाटी करणे, मारपिट करणे, दुखापत करने अशा प्रकारचे गुन्हे करतो. नमुद गुंड प्रवृत्तीचा इसम हा ईतरांचे जिवीत व व्यक्तीगत सुरक्षीतता धोक्यात येईल असे कृत्य करतो. त्याची परिसरात दहशत निर्माण झालेली आहे. त्याच्या दहशतीमुळे नागरीकांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झालेली आहे. नमुद इसमाचे बेकायदेशीर वागण्यामुळे व वाईट कृत्यांमुळे लोकांचे जिवीतास व मालमत्तेस धोका निर्माण झालेला आहे. त्याचे गुन्हेगार प्रवृत्तीला आळा बसावा, करीता त्याचेवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. परंतु त्याने प्रवृत्तीत कोणतीही सुधारणा न झाल्याने नमुद गुन्हेगाराविरूध्द वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे ईमामवाडा यांनी आरोपीस हद्दपार करणेसाठी मा. पोलीस उपायुक्त परि. क. ४. नागपुर शहर यांचे कडे प्रस्ताव सादर केला. मा. पोलीस उपायुक्त यांनी वर नमुद आरोपीचे विरूध्द आदेश पारीत करून नमुद आरोपीस आदेश क. १०/२०२४ दि. २५.०९.२०२४ रोजी नागपुर शहर तथा ग्रामीण हद्दीतुन ०१ वर्षाकरीता हद्दपार आदेश पारीत केला आहे. नमुद हद्दपार ईसमास दिनांक २५.०९.२०२४ रोजी हिंगणघाट जि. वर्धा येचे नातेवाईकाकडे सोडण्यात आलेले आहे. नमुद हद्दपार ईसम हा नागपूर शहरात आढळुन आल्यास पोलीस ठाणे ईमामवाडा संपर्क क. ०७१२-२७४३०८८, २७०६३४३ तसेच, डायल ११२ पोलीस नियंत्रण कक्ष येथे संपर्क साधावा.