नागपूर :- सप्टेंबर महिण्यात येणाऱ्या श्रीकृष्ण जन्माष्टमी, दहिहंडी पोळा, बडग्या, मारबत तसेच गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद या सण उत्सवाचे पार्श्वभूमीवर पोलीस दलाने आपली तयारी चालू केली असून, सदर सण उत्सव शांततेने व सौदार्यपुर्ण उत्साहात पार पाडावे, हया अनुषंगाने पोलीस व जनता तसेच पोलीस व सदर उत्सव साजरा करणारी मंडळे यांचे पदाधिकारी यांच्या समन्वय बैठकांचे आयोजन आज दिनांक २९.०८.२०२३ रोजी परिमंडळ क्र. ०४ मधील पोलीस ठाणे अजनी, ईमामवडा, हुडकेश्वर व वाठोडा येथे करण्यात आले.
सदर बैठकीस पोलीस ठाणे येथील शांतता समिती मोहल्ला समिती महिला दक्षता समिती यांचे पदाधिकारी व उत्सव मंडळाचे पदाधिकारी हजर होते. सदर बैठकीस परि क. ४ चे पोलीस उप आयुक्त विजयकांत सागर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच उत्सव तयारीचे अनुषंगाने मंडळाच्या सुचना व अपेक्षा याबाबत चर्चा करून त्यावर पोलीस दलाकडून आवश्यक उपाययोजना केली जाईल असे मंडळांना आश्वस्त केले.
सदर बैठकीस संबंधित पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी व इतर अधिकारी व अंमलदार हजर होते.