सन 2024 मधील जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्यासंदर्भात परिपत्रक निर्गमित

मुंबई :- सन 2024 मध्ये राष्ट्रपुरूष, थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन कार्यक्रम साजरे करण्याचे शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहे. यामध्ये दर्शविलेले कार्यक्रम सार्वजनिक सुट्टी, साप्ताहिक सुट्टी आणि स्थानिक सुट्टीच्या दिवशी येत असतील आणि या संदर्भात केंद्र शासनाने बदल सुचविल्यास त्याप्रमाणे साजरे करावेत, अन्यथा ते कार्यक्रम त्याच दिवशी साजरे करण्यात यावेत, असे परिपत्रकात नमूद आहे.

परिपत्रकामधील सर्व कार्यक्रम विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या विभागातील, जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात आयोजित करण्याबाबत सूचना देऊन अंमलबजावणीबाबत कार्यवाही करावी, असेही परिपत्रकात नमूद आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शेतकऱ्यांना पारेषण विरहित सौर कृषीपंप अनुदान तत्वावर उपलब्ध 

Thu Dec 28 , 2023
नागपूर :- पीएम-कुसुम योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे यासाठी राज्यातील शेतकऱ्याना कृषी वापरासाठी पारेषण विरहित सौर कृषीपंप अनुदान तत्वावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत 3,5, 7.5 एच. पी. क्षमतेचे सौर कृषीपंप 90 ते 95 टक्के अनुदानावर उपलब्ध आहेत. सौर कृषीपंपासाठी पात्र लाभार्थ्यांना पंपाच्या क्षमतेनूसार खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यास 10 टक्के आणि […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com