नागपुर – यशोधरानगर पुलिस स्टेशनच्या हद्दीत दि. 28.03.22 चे रात्रि ०८.०० वा ते ९.०० वा दरम्यान फिर्यादी किशोर पांडुरंग
बोरकर वय 49 वर्ष रा. आनंद नगर, यशोधरानगर नागपूर हे आपली होंडा अँक्टीव्हा 3 जी गाडी क्रमांक एम एच 49 वाय 7893 ने त्यांचे परिचीत अशोक खापेकर यांचे घरी काही कामानिमीत्त गेले असता त्यांनी आपली मोपेड गाडी ही खापेकर यांचे घरा समोर उभी करून ठेवली होती . कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीची मोपेड
गाडी चोरून नेली अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरून अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा कलम 379 भादवि.प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपी इसम नामे मोहम्मद नाौशाद अंसारी वल्द मोहम्मद नजीर अंसारी वय 32 वर्ष रा. गुलशन नगर प्लॉट नं. 126 राजु किराणा दुकानाजवळ पो.स्टे.कळमना नागपुर 2) खलील खान वल्द अकील खान वय 25 वर्शे रा. प्रवेष नगर ख्वाजा एसटीडी जवळ गल्ली नं. 1 पो.स्टे. यशोधरा नगर नागपुर टिपु सुल्तान चौक येथे वाहन चालवितांना सशंईतरित्या मिळुन आल्याने त्याचे ताब्यातील अँक्टीव्हा गाडी वाहनावर क्रमांक बघीतला असता गाडीचे समोर नंबर प्लेटवर एम एच 49 वाय 7893 असे दिसुन आले असुन मागिल बाजुला नंबर प्लेट दिसुन आली नाही. त्यांना नमुद वाहनाचे कागदपत्राची मागणी केली असता त्याने कागदपत्र न दाखवता वाहनाबाबत उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यास त्यांचे वाहनासह पो.स्टे. ला आणुन पो.स्टे. चे अभिलेख पडताळणी केली असता सदर वाहनाबाबत पो.स्टे. ला अप.क्र. 204/22 कलम 379 भादवि. प्रमाणे दाखल असल्याचे दिसुन आले. त्यास वाहनाबाबत अधिक बारकाईने विचारपुस केली असता त्याने नमुद गुन्हा केल्याचे निश्पन्न झाल्याने नमुद वाहन हे मालमत्ता शोध जप्ती नमुना प्रमाणे आरोपी कडुन वेळीच पंचा समक्ष जप्त करून आरोपींना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली. सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली एम एच 49 वाय 7893 ही यातील आरोपीतांनी संगनमत करून मोपेड गाडी चोरी केल्याचे निश्पन्न झाल्याने गुन्ह्यात कलम 34.भादवि. प्रमाणे वाढ करण्यात आली..नमुद गुन्हयातील आरोपीस ताब्यात घेवुन त्यास पो.स्टे. ला आणुन वरील नमुद दाखल गुन्हयासबधाने विचारपुस केली असता त्याने केल्याचे निश्पन्न झाल्याने आरोपी कडुन पांढऱ्या रंगाची मॅस्ट्रो गाडी जिचे मागे बाजुला नंबर प्लेट नसुन समोर भागाला नंबर प्लेट आहे. नंबर प्लेटवर एम एच 49 एस 2203 मेस्ट्रो गाडी किं.अं. 40,000/रु ची आरोपी क्र. 1 चे ताब्यातुन जप्त करण्यात आली. तसेच आरोपीने दिलेल्या कबुली निवेदना प्रमाणे मेमोरंडम जप्ती पंचनामा प्रमाणे जप्त करण्यात आली. आरोपीने नमुद दोन्ही गुन्ह्यामध्ये आरोपी क्र. 2 याचे सह मिळुन चोरी केल्याचे व निश्पन्न झाले. सदर गुन्ह्यात आरोपीचा एमसीआर आज रोजी मा. न्यायालयात हजर
करण्यात आले असुन पुढील तपास सुरू आहे.
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त मनिष कलवानीया, परिमंडळ 5 नागपुर शहर, सहा.पो.आयुक्त संतोष खांडेकर जरिपटका विभाग नागपुर शहर यांचे मार्गदर्शनाखाली संजय जाधव वरिश्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कन्नाके सहा.पो.निरी. पो.हवा. संजय कोटांगळे, पो.शि. किशोर कोडापे पो.शि. किशोर चव्हाण, पो.शि. पंकज पराते, पो.शि.मनोज ढोले, पो.शि. रवि वाहने यांनी केली आहे