अरोली :- खात – रेवराल जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या घोटमुंढरी येथील आदर्श जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.
यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी गटागटाने एकत्र येऊन शाळेच्या पटांगणात दुकाने लावून विविध पकवान्न तय्यार करून आणले होते .याचा आनंद सर्व गावकरी,ग्रामपंचायत कमिटी,सर्व शिक्षक,मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती ने आपला सहभाग नोंदवला आणि उत्कृष्ठ पणे कार्यक्रम पार पडला.
याप्रसंगी प्रमुख उपस्थिती सरपंच चंदा गेडाम, उपसरपंच श्याम वाडीभस्मे, सदस्य विलास पटले,शंकर पटले, मोसमी घरडे व इतर सदस्य तसेच मुख्याध्यापक शेषराव आंबिलढूके, शिक्षक वृंद वासनिक,सुखदेवे ,वंजारी ,धारगावे, महादूले,किरपान ,आचले, मेश्राम, शिक्षिका वृंद थुलकर ,खेताडे,खंडाईत , परिहार ,शिवणी,आष्टी, ढोल मारा शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकवृंद,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उदय पांडे,सदस्य प्रवीण राऊत, अपर्णा घरडे,नीता घरडे,डॉक्टर रंगारी,ग्रामपंचायत कर्मचारीवृंद परमवीर गजभिये,विनोद देवतारे,विनय पांडे,आशा वर्कर कल्पना रंगारी, अर्जुन घरडे इत्यादी उपस्थित.