– २१ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेचा दुसरा दिवस
नागपूर :- मुलांचे भावविश्व आता बदलते आहे. परिकथेतून आता ते नव्या स्वरूपाकडे जाते आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान ते कार्टून आणि सध्याच्या जगाचे प्रश्न नव्या पिढीचे प्रश्न आहे. यावर भाष्य करणारी बालनाट्ये आज स्पर्धेेत सादर करण्यात आली. २१ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेत सायंटिफिक सभागृहात आज ‘माणसं’ हे बालनाट्य सादर करण्यात आले. या नाटकाचे लेखक रावबा गजमल होते तर दिग्दर्शन किशोर येळणे यांनी केले. संगीत तेजस नहातकर, नेपथ्य ज्योती गवळी, अनघा साल्पेकर, रंगभूषा आणि वेशभूषा नलिनी कोल्हे, सुनंदा वºहाडे, माधुरी नहातकर यांनी केली. रंगमंच व्यवस्था ऋषिकेश लंगोटे तर प्रकाश योजना सपन राऊत यांनी केली. यात विधी खराबे, स्वरा मालवे, युक्ता तिजारे, आस्था हूड, आदित्य बैस, निपुण ढोके, स्वरूप ऊके, आराज्ञा गवळी, काव्या मोहिते, आरोही वरंभे, पियुष दास, इशिका बारापात्रे यांनी भूमिका केल्या. माणूस पूर्वी माकड होता. मग त्याला बुद्धी झाली. त्याने प्रगती केली, जंगल कापले आणि विकास केला, पण या विकासातून त्याने स्वत:चाच विकास खुंटला आणि काळोखात टाकला. हे सांगण्याचा प्रयत्न या नाटकातून करण्यात आला.
‘गणित देश’
या स्पर्धेत नेताजी मार्केट हिंदी माध्यमिक शाळा, मनपातर्फे ‘गणित देश’ हे बालनाट्य सादर करण्यात आले. या नाटकाच्या मूळ लेखिका रेखा जैन होत्या. त्याचे मराठी भाषांतर पुष्पक भट यांनी केले तर दिग्दर्शन निकिता ढाकुलकर यांनी केले होते. संगीत मयूर मानकर, प्रकाश योजना अक्षय खोब्रागडे, नेपथ्य मयूर मानकर, रंगभूषा आणि वेशभूषा निकिता ढाकुलकर यांनी केली. यात आईशा खान, ज्योति शाहू, अनुराग मारवाडी, यमन शाहू, सोनाक्षी शाहू, सुरज शाहू, गौरव टेंबरे, संध्या शाहू, अमिन शेख, तनिषा शाहू, हरीश, मयंक शाहू, जीविका गायकवाड, साक्षी शाहू, बुद्ध्यांश, नुमान अली, रोहित कोरी, अलिशा खान यांनी भूमिका केल्या. गणित हा विषय मुलांना कठीण जातो. पण गणिताशी मैत्री केली आणि तो समजून घेतला तर तोच विषय आवडीचा होऊ शकतो. त्या विषयात खूप मजा पण येऊ शकते. हाच विषय नाटकातून सादर करण्यात आला. हे फक्त गणित विषयाच्या बाबतीत नाही, तर प्रत्येक विषय जो कठीण वाटतो त्या विषयाच्या बाबतीत हेच घडू शकते. हे सांगण्याचा प्रयत्न या नाटकातून करण्यात आला. त्यामुळे मुलांनी कुठल्याही विषयाची भीती न बाळगता त्या विषयाशी मैत्री केली तर कुठलाही विषय कठीण न राहता तो आपल्यासाठी सोपा होऊ शकतो, हे या नाटकातून यशस्वीपणे सांगण्यात आले.
ताई’
यानंतर या स्पर्धेत ‘ताई’ हे बालनाट्य सादर करण्यात आले. या नाटकाचे लेखक रुपेश पवार आणि दिग्दर्शक अक्षय खोब्रागडे होते. हंसापुरी हिंदी माध्यमिक शाळा, मनपा तर्फे हे नाटक सादर करण्यात आले. यात धानी, अश्मिरा अली, वैष्णवी, अल्फीया खान, मयूर खांडेकर, संध्या चव्हाण, तस्वीया खान, रिजवान अन्सारी यांनी उत्कृष्ट भूमिका केल्या. तंत्र दिग्दर्शन अतुल आडे, प्रकाश योजना अक्षय खोब्रागडे, नेपथ्य पुष्पक भट, रंगभूषा ऋतुजा वानखेडे यांनी केली. हे नाटक आपल्या शिक्षण व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करणारे आहे. आपल्याला शिक्षण खूप मिळते. पण मोठ्यांचा आदर करावा, आपल्यात शिस्तप्रियता बाणावी, व्यावहारिकता समजावी म्हणून शिक्षण आपल्याला काहीही ज्ञान देत नाही. यावर भाष्य करणारे हे नाटक लहान मुलांना संस्कारक्षम करणारे होते. लेखक प्रेमचंद यांच्या कथेवर आधारीत हे नाट्य होते. ताई शिक्षणात मागे पडते व्यवहारात आणि वागण्यात मात्र ती अखेर अव्वल ठरते, असे नाटकात दाखविण्यात आले आहे.
‘एलियन्स – द ग्रेट’
या स्पर्धेत जीवन विकास एज्युकेशन सोसायटी तर्फे ‘एलियन्स -द ग्रेट’ हे नाटक सादर करण्यात आले. या नाटकाचे लेखक धनंजय सरदेशपांडे आणि दिग्दर्शक निकेतन शहारे होते. यात वंश चौखंडे, प्राजक्ता घुग्गुसकर, साहिल राऊत, समीक्षा वासनिक, कल्याणी कोहपरे, श्वेता साठवणे, वैदेही इंगळे, कार्तिक हिंगे, अधांश बोरकर, अंकित पाल, रिद्धी झाडे, मयंक चौखंडे, हिमांशू गाडेकर, सोनाली इंगळे यांनी भूमिका केल्या. संगीत संयोजन सुरज वैद्य, प्रकाश योजना अनिल भालेराव, नेपथ्य ज्योती गुल्हाने, नृत्य दिग्दर्शन हेमलता चौखे, निखिल दांडेकर, वेशभूषा निलिमा वाघमारे, रंगभूषा कल्पना सदावर्ते आणि निर्मिती नवप्रतिभा हायस्कूल, मिरची बाजार यांनी केली होती. आज एकूणच कुटुंब व्यवस्था एकल कुटुंब व्यवस्थेवर स्थिर होते आहे आणि कुटुंब तुटतात आहे. यामुळे समाजात दरी निर्माण होत आहे. लहान मुलांवर त्याचा जो विपरित परिणाम होत आहे ते दाखवण्याचा प्रयत्न या नाटकातून करण्यात आला आहे.
‘वीर बाबुराव’
या स्पर्धेत हेमेंदू रंगभूमी तर्फे ‘वीर बाबुराव’ हे चैतन्य दुबे लिखित व दिग्दर्शित नाटक सादर करण्यात आले. हे एक ऐतिहासिक नाटक होते. यात मानव श्रीरामे, सुशांत फारकुंडे, मंदार नायर, धनश्री शेलोटे, अनुष्का लिंगे, समृद्धी देराश्री, रेयांश चौधरी, जयकिशन धनराजनी, नकुल जोशी, अद्वैत मुलकर, शमिश दीक्षित, मधुरा अदिकाने, आदर्श सार्वे, अबीर किडे, ईशान मुंदडा, राजवीरसिंग बैस, वैभव तिवारी यांनी भूमिका केल्या. या नाटकाची प्रकाशयोजना वृषभ धापोडकर, नेपथ्य हर्ष नागभिडे, रंगभूषा आणि वेशभूषा सेजल शिंदे, पार्श्वसंगीत आशुतोष चेर्जर्ला, विशेष आभार भारतीय कृषी विद्या विहार तेलंगखेडी यांचे होते. नैसर्गिक आवासात मानवी अस्तित्वाचे आणि जगण्यासाठी संघर्षाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाºया दंडकारण्याच्या ऐतिहासिक आणि शौर्यपूर्ण इतिहासाची माहिती आजच्या पिढीसमोर आणण्याचा प्रयत्न या एकांकिकेद्वारा करण्यात आला आहे.
‘शोध-ट्रिंग- ट्रिंग’
या स्पर्धेत स्कूल आॅफ स्कॉलर्स, अत्रे लेआऊट तर्फे ‘शोध -ट्रिंग- ट्रिंग’ हे लेखक व दिग्दर्शक नीता मिसाळ यांच्यातर्फे बालनाट्य सादर करण्यात आले. या नाटकाचे नेपथ्य देवेंद्र कुंभलकर तर संगीत ऋषिकेश गिरडकर यांनी केले होते. वेशभूषा संजना लांबट तर विशेष मार्गदर्शक पंकज धोटे होते. यात आरोही भागवत, सर्वार्थ कळमकर, ओम कुलकर्णी, शौर्य पुजारी, अनघ देशमुख, अवनीक कोहळे, शांभवी धोंडसे, प्रिशा चांदेकर, आरव देशपांडे, काश्वी देशपांडे यांनी उत्कृष्ट भूमिका केल्या. टेलिफोनचा शोध लागला, जग जवळ आले. माणसं एकमेकांशी संवाद साधायला लागले पण हा संवाद खरे संवाद राहिला का? हे प्रश्नचिन्ह आहे. आज माणसांमधला संवादच हरवला आहे, यावर भाष्य करणारे नाटक हे होतं. सर्वच मुलांनी अतिशय गांभीर्याने हे नाटक सादर करून हा विषय बाल रसिकांपर्यंत पोहोचवला.
‘राखेतून उडाला मोर’
या स्पर्धेत देवरंजन बहुउद्देशीय संस्थेतर्फे ‘राखेतून उडाला मोर’ हे लेखक डॉ. सतीश साळुंखे आणि दिग्दर्शक चिन्मय देशकर दिग्दर्शित बालनाट्य सादर करण्यात आले. यात समिधा वानखेडे, व्यंकटेश माकडे, अंश केदार, जश्वी ताडपल््लीवार, स्वरा तांबे, तिया येरणे, परिणीती देशकर, प्रियांशू सुफलकर, जानविका ताडपल्लीवार, आयुष इंगोळे, शौर्य ठाकरे, आर्यन इंगोळे, धानी नागपुरे यांनी उत्कृष्ट भूमिका केल्या. नाटकाचे संगीत सौरभ कांबळे, नेपथ्य सतीश काळबांडे, प्रकाश योजना प्रवीण देशकर, रंगभूषा हर्ष नागभिडे, वेशभूषा समाप्ती देशकर तर रंगमंच व्यवस्था मुग्धा देशकर काळे आणि स्तवन गवारे यांनी पाहिली होती. अनेक गरीब मुलांना शिक्षण घेण्याची इच्छा असते पण परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेता येत नाही. त्यांची अशावेळी खूप घुसमट होते. इतरांनी ती समजून घेतली तर त्यांच्या आयुष्यात खूप मोठा आनंद पेरता येऊ शकतो. काही मुले अशा मुलांच्या आयुष्यात हाच शिक्षणाचा आनंद पेरतात आणि स्वत:ही समाधानी होतात. या आशयाचे हे सुंदर नाट्य होते.