मुलांनो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श घ्या- आदिम नेत्या ऍड. नंदा पराते  

नागपूर  :- आदिम संशोधन व अध्ययन मंडळ व अस्तित्व क्रियेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गोळीबार चौक आणि टिमकी या भागातील गरीबांच्या लहान मुलांचे व्यक्तिमत्व विकास शिबिराचे समापन संपन्न झाले. या समारोप प्रसंगी आदिम नेत्या ऍड.नंदा पराते म्हणाल्या की आपले आईवडील मोलमजुरी करून गरीब परिस्थिती असतांना तुम्हाला शिक्षण देत आहे, आपण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श समोर ठेऊन शिक्षणाची आवड निर्माण झाली पाहिजे , या हेतूने उन्हाळी ३२ वर्षापासुन सुरू असलेले व्यक्तिमत्व विकास शिबिर या माध्यमातून हलबा जमातीतील गरीब असलेल्या कुटूंबात शिक्षणाचे महत्व व विद्यार्थींचे व्यक्तिमत्व विकास होते, गरिबांच्या मुलांनी हालअपेष्टा सहन करून उच्च शिक्षण घेतल्यास तो ध्यानी विद्यार्थी वाघासारखा गुरगुरुन अन्यायाविरोधात संघर्ष करतो.

नागपुर येथील समारोप क्रार्यक्रम टिमकी, टोपरे विहीरजवळ झाला. वासुदेव वाकोडीकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख अतिथी आदिम नेत्या ऍड. नंदा पराते व मंचावर डॉक्टर हेमचंद्र रामटेककर , बलवंतजी मेश्राम, , रवी पराते, हरीश निमजे,. शालिनी निमजे, . सरोज निमजे,  प्रकाश निमजे उपस्थितित साजरा करण्यात आले.

कार्यक्रमाच्या संचालन दिपाली यांनी केले.शिबिराला यशस्वी करण्याचे श्रेय प्रकाश निमजे, हरेश निमजे, विजय भनारकर, प्रदिप पौनीकर, देवराव उमरेडकर, मोरेश्वर पराते, विष्णु भनारकर तसेच मॉनिटर तुलसी निमजे, दीपाली नंदनवार, प्रियांशी बुरडे, यामिनी छपरघरे, शीतल पौनीकर, आयुष निमजे, नैतिक टाकडीकर, हर्ष धार्मिक, ऋषभ बुरडे, सक्षम हेडाऊ, आरुचि गौरकर, सेजल गौरकर पुष्कर बुरडे, आयुष धापोडकर, हर्ष कुंभारे, शुभम उमरेडकर यांचेसह अनेकांचा सहभाग होता.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रामाणिकतेने कार्य केल्यास यश नक्कीच लाभेल - पद्मश्री डॉ. शंकरबाबा पापळकर

Thu May 9 , 2024
– परिचय केंद्रास सदिच्छा भेट नवी दिल्ली :- “प्रामाणिकतेने तसेच कठोर परिश्रमपूर्वक काम केल्यास त्या कामाला नक्कीच यश मिळेल”, असे प्रेरणादायी मार्गदर्शन पद्मश्री पुरस्कार घोषित, अनाथ मुलांचे नाथ आणि थोर समाजसेवक डॉ. शंकरबाबा पापळकर यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेटी दरम्यान केले. गुरूवार दिनांक 9 मे 2024 रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते डॉ.पापळकर यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com