संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 27 – शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सन हा पोळा असून बैलपोळा व तान्हापोळा असा सन साजरा होण्याची महाराष्ट्रीयन संस्कृती अजूनही कायम आहे .तान्हापोळा हा बहुतेक लहान मुलाच्या विरंगुळ्यासाठी साजरा करण्याची प्रथा आहे लहान मुलं या दिवशी लाकडी , मातीच्या नंदीबैलाना सजवून घरोघरी जातात व त्यांना काही दक्षिना देत व तोंड गोड करीत स्वागत केले जाते मात्र या तान्हापोळ्याच्या माध्यमातून लहान मुलांना कृषी संस्कृतीची शिकवण देत असल्याचे मौलिक प्रतिपादन माजी नगरसेविका कल्पना खंडेलवाल येथिल जुनी ओली परिसरात जुनी ओली दिवाण मंदिर महिला मंडल व सखी सहेली महिला मंडळ द्वारा आयोजित तान्हा पोळा कार्यक्रमात व्यक्त केले.
तान्हापोळ्या निमित्त सहभागी समस्त बालकांनी विविध वेशभूषा परिधान करून सहभाग घेतला. यावेळी सहभागी बालकांना गोड मिठाई , फळ , चॉकलेट , बक्षीस वितरण करीत सम्मान करून तान्हापोळा साजरा करण्यात आला. तर यातील उत्तम लाकडी बैल, उत्तम वेशभूषा ला प्रथम व द्वितीय पुरस्कार देऊन सम्माणीत करण्यात आले. यावेळी दिवाण मंदिर महिला मंडल व सखी सहेली मंडल चे समस्त पदाधिकारी व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.