संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– न्यू खलाशी लाईन येथे तान्हा पोळा साजरा
कामठी :- शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण हा पोळा असून बैल पोळा व तान्हा पोळा असा सन साजरा होण्याची महाराष्ट्रीयन संस्कृती अजूनही कायम आहे .तान्हा पोळा हा बहुतेक लहान मुलांच्या विरंगुळयासाठी साजरा करण्याची प्रथा आहे.लहान मुले या दिवशी लाकडी,मातीच्या नंदी बैलांना सजवून घरोघरी जातात व त्यांना काही दक्षिणा देत व तोंड गोड करीत स्वागत केले जाते मात्र या तान्हा पोळ्याच्या माध्यमातून लहांन मुलांना कृषी संस्कृतीची शिकवण देत असल्याचे मौलिक प्रतिपादन लोकसेवक सुभाष सोमकुवर यांनी कामठी येथील न्यू खलाशी लाईन येथे आयोजित तान्हा पोळा कार्यक्रमा प्रसंगी व्यक्त केले.
दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा न्यू खलाशी लाईन येथे तान्हा पोळा आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त बालक वर्ग या तान्हा पोळ्यात सहभागी झाले होते.दरम्यान बालकांनी नंदी बैलाला सजवून ,उत्तम वेशभूषा केले होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक सुभाष सोमकुवर, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र वाघमारे,रमेश डोंगरे,राजेश मेश्राम, प्रमोद बेलेकर,प्रवीण लांजेवार,मिलिंद चवरे,नयन सोमकुवर, आशा चवरे,छाया खोब्रागडे,ललिता मेश्राम,सुनील रामटेके, सीमा सोमकुवर आदी उपस्थित होते.