यवतमाळ :- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्ती आणि नियुक्ती झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांची नोंदणी करताना तांत्रिक अडचणी येत आहे. अशा शासकीय आस्थापनांनी प्रशिक्षणार्थ्यांची माहिती उद्या दि. 19 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद, यवतमाळ या कार्यालयकडे आवश्यक कागदपत्रांसह सादर करावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त प.भ.जाधव यांनी केले आहे.
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय, नवी मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार विविध शासकीय आस्थापनेवर यापूर्वी रुजू झालेले परंतु https://cmykpy.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणीकृत नसलेल्या उमेदवारांची नोंदणी करण्याकरीता शेवटची संधी म्हणून या कार्यालयाच्या एसी ॲडमिन लॉगिनमध्ये नोंदणी करण्याची सुविधा आज दि.19 डिसेंबर पर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
त्या अनुषंगाने ज्या शासकीय आस्थापनांमध्ये सदर योजनेंतर्गत नियमानुसार नियुक्त केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांची माहिती आवश्यक कागदपत्रासह सादर करण्यात यावी. संबंधित आस्थापणेचे पत्र, उपरोक्त संकेतस्थळावर नोंदणी नसलेल्या प्रशिक्षणार्थ्यांची यादी, संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात आलेले रुजू आदेश, प्रशिक्षणार्थ्यांचे स्वयंघोषणापत्र, शैक्षणिक कागदपत्रांची 12 वी, पदविका, पदवी इत्यादींच्या सत्यप्रती, आधार कार्डची सत्यप्रत, एम्ल्पॉयमेंट कार्ड, आस्थापनेनी प्रशिक्षणार्थ्यांना दिलेले आदेशामध्ये जावक क्रमांक रजिस्टरमधील नोंदणी असल्याचे कार्यालय प्रमुखाच्या स्वाक्षरीने व शिक्यानिशी सत्यप्रत, आधार लिंक व सिंडींग असलेले बँक पासबुकची सत्यप्रत इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहे.
सदर माहिती आज दि. 19 डिसेंबर पर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, उद्योग भवन, 4 था माळा दारव्हा रोड, यवतमाळ या कार्यालयात सादर करावी. जेणेकरून प्रशिक्षणार्थींची उपरोक्त संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी व विद्यावेतन करण्याची कार्यवाही विहित मुदतीत पूर्ण करणे शक्य होईल. सदरची माहिती विहित मुदतीत या कार्यालयास प्राप्त न झाल्यास व त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांची संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी न झाल्यास विद्यावेतना बाबतची जबाबदारी संबंधित कार्यालयाची राहील याची नोंद घ्यावी, असे जिल्हा कौशल्य विकासचे सहायक आयुक्त प. भ. जाधव यांनी कळविले आहे.