मुंबई :- माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आणि माजी प्रधानमंत्री लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मंत्रालयात माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आणि माजी उपपंतप्रधान लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय एकता दिवस निमित्त राष्ट्राची एकता, अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी समर्पित भावनेने काम करण्याची शपथ उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी यांना दिली.
यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी इंदिरा गांधी व वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन केले.
माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी, लोहपुरूष सरदार पटेल यांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com