मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात राज्याचे शिष्टमंडळ प्रधानमंत्र्यांना भेटणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही

मुंबई : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात राज्याचे शिष्टमंडळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना त्याबाबत विनंती करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली.

सदस्य छगन भुजबळ यांनी मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सभागृहातील सर्व सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यातील शिष्टमंडळासह प्रधानमंत्र्यांची भेट घेण्यात येईल आणि त्यांना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत कार्यवाही लवकरात लवकर करावी अशी विनंती करण्यात येईल.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने जिल्हाधिकारी कायालयावर मोर्चा..

Mon Feb 27 , 2023
बुलढाणा – जिल्हाधिकारी तूम्मोड यांची मनसेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन किमान वेतन आणि कामगार सुविधा मिळण्याबाबत कामगार अधिकारी यांच्याकडून होत असलेल्या दिरंगाईबाबत विषय मांडले. खामगाव नागरपरिषदेसाठी कचरा वाहतूक करण्याऱ्या कंत्राटी कामगारांना किमान वेतन लवकरात लवकर लागू नाही केले गेले तर आंदोलन तीव्र होईल असे मनसे कामगार सेनेचे उपाध्यक्ष केतन नाईक यांनी यावेळी सांगितले.एकीकडे मुख्यमंत्री सफाई कामगारांसाठी मंत्रिमंडळात घेतलेल्या निर्णयांचा पाढा वाचत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com