शिक्षकदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साधणार शिक्षकांशी संवाद.

समाजमाध्यमांवरून होणार थेट प्रसारण

मुंबई, दि. ४: – शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी (दि. ५ सप्टेंबर) राज्यातील शिक्षकांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे थेट संवाद साधणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्षा शासकीय निवासस्थानातून दुपारी १ वाजेपासून दृकश्राव्य प्रणालीद्वारे राज्यातील विविध जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये उपस्थित राहणाऱ्या शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. कोरोना संकटानंतर अलिकडेच शैक्षणिक वर्षाला नियमितपणे सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारने नव्या शैक्षणिक धोरणाचा अंगीकार करण्याचे जाहीर केले आहे. या अनुषंगाने राज्यातील शैक्षणिक क्षेत्रातील विविध मुद्दे आणि नवी दिशा यांचा या संवादादरम्यान उहापोह होणे अपेक्षित आहे. या संवादाचे मुख्यमंत्री सचिवालयाच्या समाज माध्यमांवरून थेट प्रसारण करण्यात येणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

जयस्तंभ चौकातील बस स्टॉप मध्ये इसमाची गळफास लावून आत्महत्या..

Mon Sep 5 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 5 – स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जयस्तंभ चौक बस स्थानक मध्ये एका 70 वर्षीय इसमाने कापडी दुपट्ट्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना काल रात्री साडे अकरा दरम्यान निदर्शनास आल्याने सर्वत्र खळबळ माजली मृतक इसमाचे नाव तुकाराम नागो कोकाटे रा रमानगर कामठी असे आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी वेळीच घटनास्थळ गाठून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!