– सरकारचे पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे अभिनंदन
मुंबई/नागपुर :- मराठा आरक्षणावर गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलकांच्या बहुसंख्य मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्ण करीत पूर्ण करीत यशस्वी तोडगा काढला. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला न्याय मिळवूण देणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा समाजाचे खरे कैवारी आहेत. महायुती सरकारच्या धाडसी निर्णयाचे स्वागत अशी प्रतिक्रीया पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी केली.
प्रसिद्धी पत्रकाद्वारे बोलताना जयदीप कवाडे म्हणाले की, स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जयंती दिनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा हा निर्णय ऐतिहासिक असून गेल्या अनेक वर्षांची मराठा समाजाची तपश्चर्या पूर्ण झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मनोज जरांगे-पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता संवैधानिकरित्या आंदोलन करीत होते. त्यांच्या आंदोलनाची दखल पहिल्या दिवसापासून महायुती सरकार करीत आहे. आज मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा तिढा सोडवून राज्यातील जनतेला न्याय मिळवून दिले. यापुढेही महायुतीचे सरकार अशाच पद्धतीचे धडाडीचे ऐतिहासिक निर्णय घेणार असल्याची विश्वासही जयदीप कवाडे यांनी व्यक्त केले. दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने समस्त मराठा समाजाला आरक्षण मिळवूण देण्याची शपथ घेतली होती. ती शपथ मुख्यमंत्र्यांनी आज मराठा समजाला दिलेला अध्यादेशातून खरी करून दाखवली. आतापर्यंत कोणत्याही मुख्यमंत्र्यांना जे शक्य झाले नाही ते आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. हे अभिमानास्पद बाब असल्याचेही जयदीप कवाडे यावेळी म्हणाले. पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे आज सरकारच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.