सातारा :- कराड येथील नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
या लोकार्पण सोहळ्याला राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलिस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते. कराड येथे ५ मजली भव्य प्रशासकीय इमारत उभारण्यात आलेली आहे. १७ कोटी २ लाख ५० हजार रुपये असा या इमारतीचा बांधकाम खर्च आहे. या इमारतीचे एकूण क्षेत्रफळ ७,५७३ चौ.मी. इतके आहे. तसेच या इमारतीमध्ये प्रांत कार्यालय, तहसीलदार कार्यालय, कृषी, उपनिबंधक, नगरभूमापन, उपकोषागार, सेतू ही कार्यालये असणार आहेत.