मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून हुतात्म्यांना अभिवादन

– महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची संकल्पना मुख्यमंत्र्यांनी मांडली

मुंबई :- महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०७ हुतात्म्यांना हुतात्मा स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हुतात्मा चौक येथील स्मृतिस्थळावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचा सर्वांगीण विकास करण्याची संकल्पना मांडली.

पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, २१ नोव्हेंबर हा महाराष्ट्रासाठी महत्वाचा दिवस असून या दिवशी केवळ अभिवादन, पुष्पचक्र अर्पण करून चालणार नाही. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील १०७ हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवणीचा हा दिवस आहे. या दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचा सर्वांगीण विकास करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आदिंनीही पुष्पचक्र वाहून अभिवादन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार मुख्यमंत्र्यांची शासन आपल्या दारी कार्यक्रमात घोषणा

Tue Nov 21 , 2023
– जिल्हास्तरीय कार्यक्रमाला हजारो लाभार्थ्यांची उपस्थिती – जिल्ह्यात ई-पिक पाहणीला 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ – उपस्थित 20 हजाराहून अधिक लाभार्थ्यांना रोपट्यांचे वाटप भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील धान हे प्रमुख पिक आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी धानाला बोनस देण्याची मागणी होत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन सातत्याने काम करते आहे. त्यामुळे नागपूर येथे होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनात धानाला बोनस जाहीर करू, अशी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!