मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरकरांच्या वतीने अभूतपुर्व स्वागत

▪ नागपुरकरांसाठी अभिमानाचा क्षण – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

▪ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व परमपुज्य हेडगेवार  स्मारकास भेट देऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले वंदन

▪ आपल्या लाडक्या भावाच्या स्वागतासाठी बहीणींची अलोट गर्दी

नागपूर :- राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नागपूर येथे आगमनाप्रसंगी नागपुरकरांनी विमानतळावर अलोट गर्दी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभूतपुर्व स्वागत केले. नागपुरकरांसाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी समाज माध्यमांवर आपल्या भावना व्यक्त करीत त्यांच्या निवासस्थानाजवळ छत्रपती चौक येथे प्रेमाने अलिंगन देऊन शुभेच्छा दिल्या.

विमानतळावर उतरल्यानंतर त्यांनी परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम, माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे, पीरिपाचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, सुभाष पारधी ॲड. राहूल झामरे, अनुसूचित जाती मोर्चाचे सतीश शिरसवान व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नामदार चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्यासमवेत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळ मार्गावर प. पू. हेडगेवार स्मारकास भेट देऊन या ठिकाणी स्वातंत्र्य देवीच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली. या भव्य विजयी मिरवणूकीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस आर्वजून सहभागी झाल्या होत्या.

सोमलवाडा चौक, राजीव नगर, छत्रपती चौक, खामला, आठ रस्ता चौक, लक्ष्मीनगर, बजाज नगर, शंकरनगर, लक्ष्मी भुवन चौक या ठिकाणी स्थानीक नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी व मोठ्या संख्येत लाडक्या बहीणींनी या भव्य मिरवणुकीत सहभाग घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

उपसभापती डॅा.निलम गोऱ्हे यांच्याकडून अधिवेशन तयारीचा आढावा

Mon Dec 16 , 2024
Ø व्यवस्थेबाबत अधिकाऱ्यांना दिले निर्देश Ø दोनही सभागृह व परिसराची पाहणी नागपूर :- महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार दिनांक 16 डिसेंबर पासून सुरु होत आहे. त्या अनुषंगाने विधानपरिषदेच्या उपसभापती डॅा. निलम गोऱ्हे यांनी तयारीचा आढावा घेतला. अधिवेशन कालावधीत कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी यंत्रणांना केल्या. विधानभवनाच्या मंत्री परिषद दालनात आयोजित बैठकीला विधानमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!