नागपूर येथे स्कीन बँक साकारण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

– उपचार घेत असलेल्या रुग्णांची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

– गरज भासल्यास एअर ॲम्बुलन्सने रुग्णांना ऐरोली येथे हलवू

नागपूर :- उमरेड येथील एमपीएम कंपनीमध्ये झालेली घटना ही दुर्देवी आहे. ज्या कुटुंबांनी आपल्या घरातील सदस्य गमावले त्या कुटुंबासमवेत शासन खंबीरपणे उभे आहे. जे कामगार जखमी झाले आहेत त्यांच्या उपचारासाठी कोणतीही कमतरता पडणार नाही. वेळप्रसंगी आवश्यकता भासल्यास रुग्णांना एअर ॲम्बुलन्सने ऐरोली येथील बर्न हॉस्पीटलमध्ये हलवू या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमरेड घटनेतील जखमी कामगारांच्या नातेवाईकांना धीर दिला.

नागपूर येथील ओरियस इन्स्टीट्यूट ऑफ मेडीकल सॉयन्सेस येथे उपचार घेत असलेल्या कामगारांची प्रत्यक्ष भेट देवून त्यांनी डॉक्टरांकडून माहिती घेतली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, हॉस्पीटलचे क्रीटकल केअर प्रमुख डॉ. ए.एस. राजपूत, स्कीन सर्जन डॉ. एस. जहागीरदार, पोलीस अधीक्षक हर्ष पोतदार, माजी आमदार सुधीर पारवे आदी उपस्थित होते.

रुग्णांच्या उपचाराची माहिती घेतांना नागपूरमध्ये स्कीन बँकेची नितांत आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना नागपूर येथे अद्ययावत स्कीन बँक साकारण्याबाबत निर्देश दिले. नागपूर येथे मोठ्या प्रमाणात शेजारील राज्यातूनही विविध घटनांमध्ये अतीगंभीर असलेल्या रुग्णांना स्कीनची आवश्यकता भासते. याबाबत त्यांनी डॉक्टरांकडून अधीक माहिती घेवून शासन स्तरावरील कार्यवाही जलद गतीने पूर्ण होईल असे सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

आज पालकमंत्र्यांच्या हस्ते “घर घर संविधान” उपक्रमाचा शुभारंभ

Mon Apr 14 , 2025
– डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचा समारोप नागपूर :- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते “घर घर संविधान” या शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी 14 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता नागपूर जिल्हयातून होत आहे. या कार्यक्रमास राज्यमंत्री आशिष जयस्वाल व खासदार शामकुमार बर्वे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्य […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!