मुंबई :- इंडियन इलेक्ट्रिसिटी अँड इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरर असोसिएशन (इमा) च्या वतीने नवी दिल्ली येथे प्रतिष्ठित १० वी मीटरिंग इंडिया परिषद -२०२४ नुकतीच संपन्न झाली. यामध्ये नामांकित मीटर कंपन्या, सरकारी संस्था, विद्युत वितरण कंपन्या इ. सामील झाल्या होत्या. यामध्ये मुख्य अभियंता (चाचणी) डॉ. मनीष वाठ यांनी महावितरणचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी ‘पॉवर क्वालिटी ॲनालिसिस आणि केस स्टडीज’ या विषयावर शोधनिबंध सादर केला. या शोधनिबंधासाठी मुख्य अभियंता (चाचणी) डॉ. मनीष वाठ यांना द्वितीय क्रमांकाच्या रु. ५१,०००/- च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या परिषदेत सादर ७० हून अधिक शोधनिबंध सादर झाले. या पुरस्काराबद्दल अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी अभिनंदन केले आहे.