संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- 21 व्या शतकातील लोकशाही राष्ट्रासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे मॉडेल हे आदर्श आहे त्यासाठी यांचा आदर्श घेऊन समाज निर्मिती करावी.राष्ट्र ,समाज व संस्कृतीच्या रक्षणासाठी सिद्ध असणारा आणि कोणत्याही त्यागाला,संघर्षाला कटिबद्ध असणारा समाज घडला तरच उद्याचा भारत दहशतमुक्त,भयमुक्त,भ्रष्टाचार मुक्त,व्यसनमुक्त आणि विज्ञानिष्ठ संस्कारित समाज निर्माण होईल असे मौलिक प्रतिपादन पुज्यनिय भदंत नागदिपंकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमात बोलत होते.
याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पूज्यनिय भदंत नागदीपणकर यांच्या हस्ते माल्यार्पण करून सामूहिक जयघोष करण्यात आला.यावेळी प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंट चे संयोजक राजेश गजभिये,प्रमोद खोब्रागडे, सुभाष सोमकुवर, उदास बन्सोड, कामठी नगर परिषद चे माजी सभापती विकास रंगारी, गीतेश सुखदेवें, सुगत रामटेके,नागसेन सुखदेवें,सुमित गेडाम , आशिष मेश्राम,रायभान गजभिये,कृष्णा यादव, दिनेश पाटील आदी उपस्थित होते.