नागपूर :- स्वराज्य संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालय आणि विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचतभवन सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.निवासी उपजिल्हाधिकारी श्रीराम मुंदडा, अधीक्षक कमलाकर गायकवाड यांच्यासह उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
विभागीय आयुक्त कार्यलयात आयोजित कार्यक्रमात उपायुक्त चंद्रभान पराते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तहसिलदार आर.के.दिघोळे,लेखाधिकारी रत्नाकर पागोटे यांच्यासह उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
उभय कार्यालयांमध्ये कार्यक्रम प्रसंगी ‘गर्जा महाराष्ट्र माझा …’ हे राज्यगीत सादर झाले.